देवगाव : गेल्या आठवडयापासुन देवगावसह परिसरात किरकोळ स्वरूपाच्या चोऱ्यांचे सत्र सुरु असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अशा दहशतीच्या वातावरणामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असुन पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधुन होत आहे.देवगावसह परिसरात चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. गेल्या आठवडयापासुन चोरीचे सत्र सुरूच असुन गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी हनुमान मंदिराजवळील इंदिरानगर क्र मांक ९१ या अंगणवाडीच्या दाराचा कडी-कोयंडा तोडुन अज्ञात चोरट्यांनी गॅस सिंलेडर चोरी करण्याचा धाडसी प्रयत्न झाला. दोन दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणी तीन चोरीचे प्रकार घडले.धानोरे स्त्यालगत राहणारे समाधान रोकडे हे शेतात काम करण्यासाठी गेल्याचे पाहुन पाळत ठेवुन त्यांच्या दोन शेळ्या चोरुन नेल्या. तसेच गावात पाच ते सहा मोटासायकल मधुन पेट्रोलची चोरी होत असुन या चोरट्यांनी धुमाकुळ घातल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे चोरट्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवुन चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी नागरिकांकडुन होत आहे.
देवगाव परिसरात चोऱ्या वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 19:22 IST
देवगाव : गेल्या आठवडयापासुन देवगावसह परिसरात किरकोळ स्वरूपाच्या चोऱ्यांचे सत्र सुरु असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अशा दहशतीच्या वातावरणामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असुन पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधुन होत आहे.
देवगाव परिसरात चोऱ्या वाढल्या
ठळक मुद्देभितीचे वातावरण : रात्रीची गस्त वाढविण्याची ग्रामस्थांची मागणी