शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावच्या विकासाची कवाडे होणार खुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 00:52 IST

मालेगावचे अर्थकारण बदलून टाकणारी आणि बकालपण घालविणारी महत्त्वपूर्ण घटना शुक्रवारी (दि.१४) घडत असून, बहुप्रतीक्षित औद्योगिक वसाहतीचा शुभारंभ होत आहे. या वसाहतीमुळे मालेगावच्या विकासाची कवाडे खुली होणार असून, अनेकांच्या हातांना काम उपलब्ध होणार आहे. या औद्योगिक वसाहतीला शासनाने डी प्लस झोनचा दर्जा दिल्यामुळे मालेगावच्या दृष्टीने औद्योगिक विकासासाठी हा एक मोठा टप्पा मानला जात आहे.

ठळक मुद्देआज औद्योगिक वसाहतीचा शुभारंभ अर्थकारणाला मिळणार चालना; बेरोजगारीचा प्रश्नही निघणार निकाली

अतुल शेवाळे । लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : मालेगावचे अर्थकारण बदलून टाकणारी आणि बकालपण घालविणारी महत्त्वपूर्ण घटना शुक्रवारी (दि.१४) घडत असून, बहुप्रतीक्षित औद्योगिक वसाहतीचा शुभारंभ होत आहे. या वसाहतीमुळे मालेगावच्या विकासाची कवाडे खुली होणार असून, अनेकांच्या हातांना काम उपलब्ध होणार आहे. या औद्योगिक वसाहतीला शासनाने डी प्लस झोनचा दर्जा दिल्यामुळे मालेगावच्या दृष्टीने औद्योगिक विकासासाठी हा एक मोठा टप्पा मानला जात आहे.मालेगाव शहराच्या बकालपणाबाबत नेहमीच चर्चा होत असते. इतिहासात झालेल्या काही दंगलींमुळे मालेगाव नेहमीच चर्चेत राहिले आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून येथील नागरिकांनी सामंजस्याचा परिचय देत दंगलीचा डाग पुसून काढला असून, नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत झाल्यानंतर शहराच्या रंगरुपानेही कात टाकण्याचा प्रयत्न चालविल्याचे दिसून येत आहे. याचसोबत मालेगावचा औद्योगिक विकास होण्याच्या दृष्टीने येथे औद्योगिक वसाहत उभारण्याबाबतची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. याविषयी वेळोवेळी निर्णयही घेण्यात येत होते. परंतु, जागेची उपलब्धता व वीज-पाणी आदी सुविधांची कमतरता यामुळे उद्योजक उद्योग उभारणीसाठी पुढे येताना कचरत होते.शेती महामंडळाच्या ५ हजार एकर पैकी पहिल्या टप्प्यात ८६३ एकर जमीन ३८ कोटी रुपयात औद्योगिक वसाहतीला मिळाली असून, ५०० चौरस मीटर पासून ४५ एकरपर्यंतचे भूखंड तयार करण्यात आलेले आहेत.मूलभूत सेवा सुविधांसाठी शासनाने ३५ कोटी रु पयांचा निधी मंजूर केला आहे.या वसाहतीत पॉवरलुम, प्लास्टिक रिसायकल युनिट, प्लॅस्टिक रियुज युनिट असून यासह इंजिनिअरिंग उद्योग यावेत अशी अपेक्षा आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी आणखी १ हजार एकर जागेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविलेला आहे.दरम्यान, मालेगाव आद्योगिक क्षेत्र टप्पा २ सायने (२८३ एकर) आणि टप्पा ३ अजंग-रावळगाव (८६३ एकर) औद्योगिक वसाहतीसाठीच्या भूखंड नोंदणीचा शुभारंभ तसेच उद्योजक परिषद शुक्रवारी (दि.१४) उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजिण्यात आली आहे.यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, खासदार सुभाष भामरे, महापौर शेख रशीद, आमदार शेख आसीफ व एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.शेती महामंडळाची जमीनजुलै २०१७ मध्ये अजंग येथील शेती महामंडळाची ३४५.२५ हेक्टर जमिन एमआयडीसीसाठी देण्यास शासनाने मंजुरी दिली होती तसेच या जमिनीस उद्योग विभागाने औद्योगिक क्षेत्र म्हणूनही जाहीर केल्याने या प्रक्रियेला चालना मिळाली होती. याशिवाय, मालेगाव व परिसरातील ३०० पेक्षा अधिक लघुउद्योजकांची यादीही शासनाकडे सुपुर्द करण्यात आली होती.वसाहतीसाठीच्या पाण्याची समस्या सोडविताना चणकापुर आणि पुनद धरणातून पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. याशिवाय गिरणा धरणातून शाश्वत पाणी पुरवठा केला जाणार आहे.सुरु वातीला शासनाने दीड हजार रु पये दर ठेवला होता. परंतु पाठपुरावा करु न आता फक्त ८०० रूपये दर ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :MalegaonमालेगांवMIDCएमआयडीसी