शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

देवळाली कॅम्पला महिलांसाठी ‘धोबीघाट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 16:33 IST

देवळाली कॅम्प : परिसरातील हाडोळा हा परिसर अत्यंत दाट लोकवस्तीचा आणि अरुंद गल्लीबोळांचा असल्याने महिलांना कपडे धुण्यासाठी पुरेशी जागा ...

देवळाली कॅम्प : परिसरातील हाडोळा हा परिसर अत्यंत दाट लोकवस्तीचा आणि अरुंद गल्लीबोळांचा असल्याने महिलांना कपडे धुण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नसल्याने त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन वॉर्ड क्रमांक एकमधील परिसरात सार्वजनिक धोबीघाट बांधण्यात आला आहे. या धोबीघाटमुळे महिलांसाठी सुविधा झाली आहेच यामुळे सामाजिक एकोपा निर्माण होण्यासदेखील मदत होणार आहे.कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत असलेल्या वॉर्ड क्रमांक एकमधील हाडोळा हा अत्यंत जुना आणि मोठा परिसर आहे. या ठिकाणी पुरेशी जागा नसल्यामुळे महिलांना कपडे धुण्यासाठी मोठी अडचण होत असल्याची बाब अनेकदा समोर आली होती. येथील नागरिकांनीदेखील याबाबतची तक्रार केली होती. या मागणीचा विचार करून महिलांसाठी सार्वजनिक धोबीघाटाची निर्मिती करण्यात आल्याने महिलावर्गाची मोठी सोय झाली आहे.येथील हाडोळा भागात अगदी अरु ंद गल्ल्या असल्यामुळे प्रत्येकाला धुणे धुण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे महिलांना रस्त्यावर कपडे धुणे भाग पडत होते. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नगरसेविका प्रभावती धिवरे यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बैठकीत धोबीघाट उभारण्याची मागणी केली होती. त्यानुसार कॅन्टोन्मेंट बोर्डाने दोन लाख रुपये निधी उपलब्ध करून देत मस्जिद स्ट्रिटवरील सार्वजनिक शौचालयालगत असलेल्या सुमारे ७ फूट लांब व २५ फूट रु ंद पडीक जागेत एकाच वेळी पाच महिला कपडे धुऊ शकतील, अशी व्यवस्था करून दिली आहे.याठिकाणी पाण्याचा नळ, कपडे धुण्यासाठी आवश्यक असलेला दगडदेखील बसवून देण्यात आला आहे. यामुळे या परिसरातील समस्या मार्गी लागल्याने महिला वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकchavaniछावणी