शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

देवनदीत कार कोसळून चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 00:12 IST

सिन्नर : सिन्नर-शिर्डी महामार्गावर खोपडी शिवारात देवनदीच्या पुलावर कारला कुत्रे आडवे आल्यानंतर, कुत्र्याचा जीव वाचविण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटून कार नदीपात्रात कोसळल्याची घटना मंगळवारी (दि.२९) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात कारचालक जागीच ठार झाला, तर अन्य दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकुत्रे आले आडवे : नियंत्रण सुटल्याने अपघात, दोन जखमी

सिन्नर : सिन्नर-शिर्डी महामार्गावर खोपडी शिवारात देवनदीच्या पुलावर कारला कुत्रे आडवे आल्यानंतर, कुत्र्याचा जीव वाचविण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटून कार नदीपात्रात कोसळल्याची घटना मंगळवारी (दि.२९) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात कारचालक जागीच ठार झाला, तर अन्य दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.नालासोपारा येथील पाच मित्र मारझो कारने (क्रमांक एम. एच. ४८ बी. टी. १४१३) शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जात असताना, सिन्नर-शिर्डी महामार्गावर खोपडी शिवारात देवनदीच्या पुलावर सदर अपघात झाला. देवनदीच्या पुलावरून कार जात असताना, अचानक कुत्रे आडवे आले. कारचालकाने कुत्र्याचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात कार पुलाला धडकून लोखंडी कठडे तोडून देवनदीच्या पात्रात कोसळली. सुमारे २० फुट खोल नदीपात्रात कार खडकावर आदळल्याने मोठा आवाज झाला. या आवाजाने परिसरातील ग्रामस्थ व वाहनचालकांनी धाव घेऊन मदतकार्य केले.वावी पोलिसांना अपघाताची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या साहाय्याने कारमध्ये अडकलेल्या एका जखमीला बाहेर काढण्यात आले. या अपघातात कारचालक साहील अनिल ब्रीद (२४) रा. नालासोपारा हा जागीच ठार झाला, तर अनिषेक शुक्ला (२५) रा. जयंत नक्ती (२४) रा. नालासोपारा हे गंभीर जखमी झाले. जखमींना अधिक उपचारसाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रकाश गवळी, सतीश बैरागी अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :dogकुत्राAccidentअपघात