तालुका कोरोनामुक्त करण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 11:19 PM2020-07-28T23:19:25+5:302020-07-29T00:57:56+5:30

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ लक्षात घेता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना व सामान्य नागरिकांचा सहभाग आवश्यक असल्याचे पाहून मंगळवारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत संयुक्त बैठक घेण्यात आला. यावेळी घेण्यात आलेल्या बैठकीत त्याची अंमलबजावणी काटेकोर करण्याचे ठरविण्यात आले.

Determination to free the taluka from Corona | तालुका कोरोनामुक्त करण्याचा निर्धार

तालुका कोरोनामुक्त करण्याचा निर्धार

Next
ठळक मुद्देआढावा बैठक : जास्तीत जास्त चाचणी करण्याचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ लक्षात घेता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना व सामान्य नागरिकांचा सहभाग आवश्यक असल्याचे पाहून मंगळवारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत संयुक्त बैठक घेण्यात आला. यावेळी घेण्यात आलेल्या बैठकीत त्याची अंमलबजावणी काटेकोर करण्याचे ठरविण्यात आले.
नाशिक पंचायत समितीच्या सभागृहात घेण्यात आलेल्या या बैठकीत नाशिक तालुक्यातील कोरोनाबाधित सध्या १७२ कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर आणण्यासाठी काटेकोर उपाययोजना राबविण्याचे ठरविण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती देतानाच कोरोना रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्कातील जास्तीत जास्त लोकांची तपासणी करणे, त्यातील संशयित रुग्णांचे नमुने घेणे, रुग्ण आढळल्यास त्याला उपचार करणे व कोरोनापासून बचावासाठी प्रयत्नशील राहणे ही सूत्री सांगून, या संपूर्ण महामारीत एकट्या आरोग्य विभागाची जबाबदारी नसून सर्व शासकीय विभागांनी त्यासाठी आपापल्या भागात प्रयत्नशील राहणे गरजेचे असल्याचे सांगितले.
सदर बैठकीत कंटेन्मेंट झोनमध्ये मास्क सक्तीने वापरणे, फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन करणे यासाठी गावपातळीवर कोरोना समिती अ‍ॅक्टिवकरून गावपातळीवर लोकसहभाग वाढवून लोकचळवळ तयार करण्याचे ठरविण्यात आले.
या बैठकीस खासदार हेमंत गोडसे, आमदार सरोज अहिरे यांच्यासह पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. रुग्ण वाढु नये यासाठी खबरदारी घ्यावीअध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी, बरे होणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. येणाºया काळात रूग्ण वाढू नये यासाठी सर्वांनी खबरदारी घेण्याची गरज असून, त्यासाठी ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्यांची मदत घेण्यात यावी व जनतेलाही त्यात सहभागी करून घेण्यात यावे, असे आवाहन केले.

Web Title: Determination to free the taluka from Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.