शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

क्रूर अत्याचाराच्या गुन्ह्यात संशयितांना कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 00:29 IST

दरी-मातोरी येथील फार्महाउसवर दोघा डीजेचालकांना अमानुष मारहाण, शिवीगाळ करत अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या ११ संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांची पोलीस कोठडीची मुदत बुधवारी (दि.२२) संपल्याने त्यांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.

ठळक मुद्देधुळ्यातील गुंडाच्या घराची झडती : पिस्तूलसह शॉक देणारे उपकरण जप्त

नाशिक : दरी-मातोरी येथील फार्महाउसवर दोघा डीजेचालकांना अमानुष मारहाण, शिवीगाळ करत अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या ११ संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांची पोलीस कोठडीची मुदत बुधवारी (दि.२२) संपल्याने त्यांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.दरी-मातोरी रस्त्यावरील शिवगंगा फार्महाउसमध्ये पंचवटीतील सराईत गुन्हेगार संदेश काजळेच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या दहा ते बारा साथीदारांनी पार्टी रंगविली होती. या पार्टीत रात्रभर धिंगाणा घालताना डीजे आॅपरेटर दोघा तरुणांना साउंडचा दर्जा चांगला नसल्याचे सांगत कुरापत काढून बेदम मारहाण केली होती. तसेच विवस्त्र करून उघड्या शरीरावर कमरेच्या पट्ट्याने बेदम करीत गंभीर जखमी केले होते.या गुंडांनी त्यांच्यासोबत अनैसर्गिक कृत्यदेखील केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ग्रामीण पोलिसांनी आठवडाभरात फरार संशयित म्होरक्या काजळेसह त्याच्या अन्य दहा साथीदारांच्या मुसक्या बांधल्या.त्यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीसह जिवे ठार मारण्याचा प्रयत्न, अनैसर्गिक अत्याचार, बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांना न्यायालयाने बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.या गुन्ह्यात फरार झालेल्या काजळेसोबत नवापूरमधून भूषण राजेंद्र सुर्वे (३०, रा. धुळे) यास अटक करण्यात आली होती. पोलिसांनी सुर्वेच्या घराची झाडाझडती घेतली असता गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल पोलिसांना मिळून आले. गुन्हा घडला त्या फार्महाउसमधून दोघा तरुणांना ज्या विद्युत उपकरणाने शॉक दिला ते उपकरणही पोलिसांनी जप्त केले आहे. दरम्यान, सर्व संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस