शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

मोबाइल पळविणारा तोतया पोलीस अधिकारी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:10 IST

ओलएक्सवर मोबाइल विक्रीची जाहिरात बघून खरेदीची तयारी दर्शवून पोलीस उपनिरीक्षक असल्याची बतावणी करायची़ त्यानंतर मोबाइल विक्रेत्यास पोलीस ठाण्याच्या बाहेर बोलावून घ्यायचे व साहेबांना मोबाइल व पावती दाखवून येतो असे सांगून मोबाइल पळविणाऱ्या मुंबईतील भामट्यास सरकारवाडा पोलिसांनी अटक केली आहे़

नाशिक : ओलएक्सवर मोबाइल विक्रीची जाहिरात बघून खरेदीची तयारी दर्शवून पोलीस उपनिरीक्षक असल्याची बतावणी करायची़ त्यानंतर मोबाइल विक्रेत्यास पोलीस ठाण्याच्या बाहेर बोलावून घ्यायचे व साहेबांना मोबाइल व पावती दाखवून येतो असे सांगून मोबाइल पळविणाऱ्या मुंबईतील भामट्यास सरकारवाडा पोलिसांनी अटक केली आहे़ सचिन अरुण आचार्य (३२, रा. चारकोप, कांदिवली, मुंबई) असे या संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून चोरीचे महागडे आठ मोबाइल व सव्वा लाख रुपये किमतीची चोरीची अ‍ॅव्हेंजर दुचाकी असा तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.  विशेष म्हणजे गत काही महिन्यांपासून तो नाशिकमधील हॉटेलमध्ये राहात होता़  सिडकोतील बबलू राठोड यांनी सॅमसंग ए-१ प्लस हा मोबाइल विक्री करण्यासाठी ओएलएक्सवर जाहिरात केली होती़ या जाहिरातीवरून संशयित आचार्य याने १२ जुलै रोजी फोन केला व नाशिक तालुका पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक कांबळे असे सांगितले़ यानंतर मोबाइल खरेदीसाठी व पाहण्याच्या निमित्ताने तालुका पोलीस ठाण्याच्या गेटवर बोलवले़ यानंतर संशयित आचार्य हा आला व कांबळे हे माझे वडील असून, त्यांना मोबाइल व बिल दाखवून येतो व पैसे घेऊन येतो असे सांगून दुसºया गेटने फरार झाला़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ याप्रमाणेच म्हसरूळ पोलीस ठाण्यातही संशयित आचार्य याने मोबाइल दाखविण्याची नावाखाली पळवून नेला होता़दरम्यान, आचार्य याने मुंबईतही घरफोड्या व दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत़ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक योगीता नारखेडे, राजेंद्र शेळके, सुनील जगदाळे, प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड, अरुण भोये, सागर हजारी, जयलाल राठोड, अमित शिंदे, संतोष लोंढे, विशाल पवार यांच्या पथकाने ही कामगिरी केली़पळ काढला होतासरकारवाडा पोलीस संशयिताचा शोध घेत असताना आठवडाभरापूर्वी जिल्हा रुग्णालयाजवळ संशयित आचार्य हा अ‍ॅव्हेंजर दुचाकीवर उभा होता; मात्र पोलिसांना पाहताच त्याने पळ काढला. त्यास पाठलाग करून पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी पकडले़ त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून आठ मोबाइल व मुंबईहून चोरलेली सव्वा लाखाची अ‍ॅव्हेंजर दुचाकी असा ३ लाख आठ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrimeगुन्हा