पंचवटी : पेठरोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लगत असलेल्या शेतात गवत कापण्यासाठी गेलेल्या तेरावर्षीय बालिकेवर अतिप्रसंग करणार्या संशयिताला न्यायालयाने ९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली़ पेठरोड परिसरात राहणार्या तेरावर्षीय बालिकेवर तीन दिवसांपूर्वी बलात्कार केल्याची घटना घडली होती. यानंतर पीडित मुलीने व तिच्या नातेवाइकांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिलेल्या फि र्यादीनुसार बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. यातील संशयित दुर्गाप्रसाद भालचंद्र सोनकर (२५, उत्तर प्रदेश) या परप्रांतीय तरुणाला नागरिकांनी पाठलाग करून पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले़ संशयित सोनकर यास पंचवटी पोलिसांनी आज न्यायालयात हजर केले असता ९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली़
बलात्कार प्रकरणी संशयिताला कोठडी
By admin | Updated: June 4, 2014 00:16 IST