शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे चारीतील अट्टल गुन्हेगार ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 01:44 IST

कळवण - येथील किसान ट्रेडर्स या कृषी सेवा केंद्राच्या दुकानाचे पाठीमागील बाजूने पत्रा कापून कांदा बियाणे व रोख रक्कम चोरुन नेणाऱ्या धुळे येथील सराईत अट्टल गुन्हेगारास मुद्देमाल, रोख रक्कमसह पकडण्यात कळवण पोलिसांना यश आले आहे. भिका सदू भोई (रा .लोंढानाला ,अकलाड - मोराणे धुळे) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देकळवण : धुळे येथून मुददेमालासह ताब्यात

कळवण - येथील किसान ट्रेडर्स या कृषी सेवा केंद्राच्या दुकानाचे पाठीमागील बाजूने पत्रा कापून कांदा बियाणे व रोख रक्कम चोरुन नेणाऱ्या धुळे येथील सराईत अट्टल गुन्हेगारास मुद्देमाल, रोख रक्कमसह पकडण्यात कळवण पोलिसांना यश आले आहे. भिका सदू भोई (रा .लोंढानाला ,अकलाड - मोराणे धुळे) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गेल्या आठवड्यात कळवण शहरातील गणेशनगर भागात कळवण देवळा रोडवरील न्यायालयासमोरील अतुल गोविंद रौंदळ यांचे मालकीचे किसान ट्रेडर्स कृषी सेवा केंद्राचे दुकानाचे पाठीमागील बाजूचा पत्रा कापून आत प्रवेश करुन घरफोडी करुन दुकानातील प्रशांत व मालाव नावाचे कांदाचे बियाणे व रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली होती या बाबत कळवण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हयाचा तपास चालू असतांना पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना गुन्ह्यातील आरोपी संदर्भात माहिती मिळवून भोई याने चोरी केली असून सदरचा आरोपी हा सध्या त्याचे राहते घरी आहे .पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदशर्नाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश निकम , पोलिस हवालदार मधुकर तारु , शिवाजी शिंदे, सुरेश पवार यांच्या पथकाने लोंढानाला , अकलाड - मोराणे ता.जि. धुळे येथे लोटानाला परिसरात सापळा रचून त्याच्या राहत्या घरुन त्याला शिताफिने ताब्यात घेतले. घराची झडती घेऊन घरात रुपये ४५०० रूपय्े किमतीचे प्रशांत नावाचे लेबल असलेले कांदा बियांणांचे एक नग अंदाजे एक किलो वजनाचे सिलबंद पाकिट तसेच २२,५०० रु . किंमतीचे प्रशांत कंपनीचे सुटे बियाणे एका प्लॅस्टिकचे पिशवीत असलेले अंदाजे वजन५ किलो असा २७हजाररुपये किमतीचा मुददेमाल जप्त केला आहे.

 

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारी