शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
3
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
4
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
5
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
6
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
7
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
8
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
9
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
10
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
11
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
12
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
13
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
14
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
15
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
16
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
17
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
18
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
19
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
20
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 

२७४ नवसैनिकांची तुकडी देशसेवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 01:31 IST

नाशिक : भारतीय तोफखाना प्रशिक्षण केंद्र नाशिकरोड येथून २७४ प्रशिक्षणार्थी नवसैनिकांची तुकडी गुरुवारी (दि.१८) देशसेवेत दाखल झाली. ४२ आठवड्यांचे खडतर सैनिकी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करत ह्यतोपचीह्ण म्हणून स्वत:ला सिद्ध करणाऱ्या नवसैनिकांनी लष्करी थाटात संचलन करत वरिष्ठ अधिकाऱ्यांना "सॅल्यूट" केला.

ठळक मुद्देतोफखाना केंद्र : कोरोनाच्या सावटाखाली पार पडला प्रशिक्षणार्थींचा शपथविधी

नाशिक : भारतीय तोफखाना प्रशिक्षण केंद्र नाशिकरोड येथून २७४ प्रशिक्षणार्थी नवसैनिकांची तुकडी गुरुवारी (दि.१८) देशसेवेत दाखल झाली. ४२ आठवड्यांचे खडतर सैनिकी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करत ह्यतोपचीह्ण म्हणून स्वत:ला सिद्ध करणाऱ्या नवसैनिकांनी लष्करी थाटात संचलन करत वरिष्ठ अधिकाऱ्यांना "सॅल्यूट" केला.सैन्यदलात भरती होण्याचे स्वप्न बघणाऱ्या युवकांना भारतीय सेनेत जाण्याचा मार्ग दाखविणाऱ्या तोफखाना केंद्राची स्थापना नाशकात १९४८ साली करण्यात आली.

गुरुवारी कोरोनाच्या सावटाखाली पार पडलेल्या नवसैनिकांच्या शपथविधी सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून केंद्राचे कमांडंट ब्रिगेडियर जे.एस. गोराया उपस्थित होते. त्यांनी मैदानावरील संचलनाचे बारकाईने निरीक्षण करत उपस्थित नवसैनिकांना त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी गुरुमंत्र देत शुभेच्छा दिल्या. फेब्रुवारी महिन्याप्रमाणेच गुरुवारीसुद्धा या सोहळ्यावर कोरोनाचे सावट पाहावयास मिळाले. संचलनात सहभागी झालेल्या २७४ जवानांच्या तुकडीने तोंडावर मास्क लावून व परस्परांमध्ये अंतर राखल्याचे दिसून आले. सैनिकी शिस्तीचे दर्शन यावेळी घडले.शपथविधीसाठी केंद्राच्या पारंपरिक प्रथेनुसार मैदानावर होवित्झर, बोफोर्स, सॉल्टम, मल्टिरॉकेट लॉन्चर यासारख्या तोफा आणण्यात आल्या होत्या. उत्कृष्ट अष्टपैलू प्रशिक्षणार्थी म्हणून नारायण शिंदे या नवसैनिकाला गौरविण्यात आले.... यंदा "गौरव पदक" जवानांकडे सुपूर्दकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तोफखान्यातील सुरक्षिततेच्या दृष्टीने जवानांच्या विविध गावांमधून येणाऱ्या पालकांना या सोहळ्यासाठी प्रवेशास मनाई करण्यात आली होती. यामुळे जवानांच्या कुटुंबीयांना या सोहळ्याला उपस्थित राहता आले नाही. मोठ्या सन्मानाने वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी यावेळी माता-पित्यांना दिले जाणारे ह्यगौरव पदकह्ण यंदा नवसैनिकांकडे सुपूर्द करत त्यांच्या माता-पित्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

टॅग्स :SoldierसैनिकIndiaभारत