शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नाशकातील विनापरवानगीचे गतिरोधक हटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 14:48 IST

आयुक्तांचे आदेश : अर्बन मोबिलिटी सेलच्या बैठकीत निर्णय

ठळक मुद्देअस्तित्वातील गतिरोधक आयआरएस प्रमाणानुसार नसल्यास आणि रोड ट्रान्सपोर्ट अ‍ॅथॉरिटीची परवानगी नसल्याचे ते हटविण्याचे आदेश शहरात बॅरिअर फ्री व वापरास अनुकूल पादचारी मार्ग निर्माण करण्याचे काम लवकरात लवकर हाती घेण्याचे प्रस्तावित

नाशिक - रोड ट्रान्सपोर्ट अ‍ॅथॉरिटीची (आरटीए) परवानगी असल्याशिवाय, यापुढे शहरात गतिरोधक न टाकण्याचे धोरण महापालिकेत स्थापन झालेल्या अर्बन मोबिलिटी सेलच्या बैठकीत निश्चित करण्यात आले. अस्तित्वातील गतिरोधक आयआरएस प्रमाणानुसार नसल्यास आणि रोड ट्रान्सपोर्ट अ‍ॅथॉरिटीची परवानगी नसल्याचे ते हटविण्याचे आदेश महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले.आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पायी चालणे व सायकल चालविण्यास प्रोत्साहन देणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणे, मनपा स्तरावर शहर बस वाहतुकीचे व्यवस्थापन करणे, ठराविक मार्गांना एकेरी अथवा दुहेरी वाहतुकीत बदल करणे, विविध चौकातील सिग्नल यंत्रणा व पादचाऱ्यांना सिग्नल यंत्रणा उभारणे, गतिरोधकांबाबत धोरण ठरविणे, विविध चौकांचे सुशोभिकरण आदी विषयांवर चर्चा झाली. यावेळी, शहर वाहतूक पोलिस शाखेने रस्त्यावर व फूटपाथवर पार्कींग करणा-या वाहनधारकांवर कारवाई करावी, अधिकृत रिक्षा थांबे निश्चित करुन त्यात रिक्षांची संख्या निश्चित करावी, द्वारका चौफुलीवरील अवैध थांबे रोखावेत, शहरात आवश्यकतेनुसार नो व्हेईकल झोन निर्माण करावेत, निवडक रस्त्यांवर एकेरी वाहतूक करावी, रिक्षांना मीटरिंग व्यवस्था कार्यान्वित करावी, शहरातील मंगलकार्यालये-लॉन्स समोरील अनधिकृत पार्कींगवर सक्तीने कारवाई करण्याचेही आदेश आयुक्तांनी दिले. शहरात बॅरिअर फ्री व वापरास अनुकूल पादचारी मार्ग निर्माण करण्याचे काम लवकरात लवकर हाती घेण्याचे प्रस्तावित असून शहर बससेवाही कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. शहरातील सर्व सिग्नलवर पादचा-यांना रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी सिग्नल निर्माण करणे व विविध चौकात, सिग्नल, रस्ता क्रॉसिंग, अधिकृत रिक्षा थांबे येथे मनपामार्फत पट्टे मारणे, कॅट आय लावणे, फलक लावणे आदी सूचना यावेळी करण्यात आल्या.भुयारी मार्ग पुन्हा सुरू होणारद्वारका चौकातील भुयारी पादचारी मार्ग त्वरित वापरायोग्य करण्यासाठी संपूर्ण मार्ग स्वच्छ करुन त्यात आवश्यक त्या दुरस्त्या करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी केल्या. त्यानुसार तेथे फलक लावणे, प्रवेशद्वाराजवळील परिसर स्वच्छ करणे, अतिक्रमण हटविणे आदी कामेही करण्यात येणार आहेत. याशिवाय, मुंबई-आग्रा महामार्गावरील सर्व्हीसरोडवरील पथदीप लावण्याबाबतही सूचित करण्यात आले. बाजारपेठांमधील दुकानांच्या समोरील अतिक्रमण हटवण्याचे आदेशित करण्यात आले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाTrafficवाहतूक कोंडी