शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा उत्तीर्ण होऊनही ते नोकरीपासून आहे वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 16:44 IST

कवडदरा : महाराष्ट्र शासनाने महावितरण कंपनीमध्ये विद्युत सहाय्यक पाच हजार व उपकेंद्र सहाय्यक पदाकरिता उमेदवारांचे अर्ज बोलावण्यात आले होते, यासाठी परीक्षा देखील घेण्यात आली. आता याचा निकाल लागला असून, कागदपत्रे पडताळणीची तारीख वारंवार रद्द होत असल्याने उत्तीर्ण उमेदवारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देकवडदरा : महावितरण कंपनीतील भरतीचा प्रश्न

कवडदरा : महाराष्ट्र शासनाने महावितरण कंपनीमध्ये विद्युत सहाय्यक पाच हजार व उपकेंद्र सहाय्यक पदाकरिता उमेदवारांचे अर्ज बोलावण्यात आले होते, यासाठी परीक्षा देखील घेण्यात आली. आता याचा निकाल लागला असून, कागदपत्रे पडताळणीची तारीख वारंवार रद्द होत असल्याने उत्तीर्ण उमेदवारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.महावितरणतर्फे जुलै २०१९ मध्ये काढण्यात आलेल्या नोकर भरतीत आयटीआय धारकांनी आॅनलाइन पद्धतीने अर्ज भरले होते. आॅगस्ट २०१९ रोजी चाचणी परीक्षा घेण्यात आली. मात्र परीक्षा देऊनही वर्षभरानंतर विद्यार्थ्यांना निकाल मिळाला नव्हता त्यामळे महाराष्ट्रातील आयटीआयधारकामध्ये संतापाची लाट पसरली होती.सदर परिक्षाचा निकाल एक वर्षांपासून स्थगित होता. तो निकाल तीन महिन्यापूर्वी जून २०२० मध्ये जाहीर झाला असून, आता कागदपत्रे पडताळणीसाठी वारंवार तारखेत बदल होत असल्याने परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार अद्यापही नोकरीपासून वंचित आहेत.महावितरण कंपनीतील जुलै २०१९ मध्ये उपकेंद्र सहायक, विद्युत सहायक भर्तीचे आयोजन केले होते. आॅगस्ट २०१९ रोजी चाचणी परीक्षा घेण्यात आली सदर परिक्षाचा निकाल एक वर्षांपासून स्थगित होता. उपकेंद्र सहायक पदाची निवड व अतिरिक्त यादी लावुन कागद पडताळणीसाठी अगोदर १६, १७ आॅगस्ट तारिख दिली. मात्र ही तारीख रद्द करून पुन्हा १५ आणि १६ सप्टेंबर तारीख देण्यात आली, सोबत जिल्हा रु ग्णालयात वैद्यकीय चाचणी घेण्यात सांगितले होते. परंतु महावितरण प्रशासनाने ही कागदपत्र पडताळणी प्रक्रि या स्थगित करण्याचे जाहीर केले.आताची परिस्थिती लक्षात घेता, कोरोना महामारीमुळे बऱ्याच मुलांचा रोजगार हिरावला गेला आहे. वारंवार भर्तीवर स्थगिती येत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य निर्माण होत आहे. लाखो विद्यार्थ्यांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. आयटीआयधारकांच्या हाताला काम नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही प्रक्रि या त्वरीत पूर्ण करून भरतीला प्राधान्य द्यावे. तसेच बेरोजगारांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीGovernmentसरकार