शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी वाढले तरीही नकारघंटा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 00:22 IST

खासगी रिक्षा-टॅक्सीचालकांनी भाडेवाढ केल्यापासून एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये पुन्हा प्रवाशांची गर्दी झाली आहे. गेल्या महिनाभरात शहरात सुरू असलेल्या बसेसचे भारमान तब्बल १० टक्क्यांनी वाढलेले आहे. याचाच अर्थ महामंडळाने सुविधा दिली, तर प्रवाशांचा प्रतिसाद नक्कीच मिळू शकतो.

एसटी प्रवाशांच्या गैरसोयीसाठी?नाशिक : खासगी रिक्षा-टॅक्सीचालकांनी भाडेवाढ केल्यापासून एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये पुन्हा प्रवाशांची गर्दी झाली आहे. गेल्या महिनाभरात शहरात सुरू असलेल्या बसेसचे भारमान तब्बल १० टक्क्यांनी वाढलेले आहे. याचाच अर्थ महामंडळाने सुविधा दिली, तर प्रवाशांचा प्रतिसाद नक्कीच मिळू शकतो. परंतु पराभूत मानसिकता स्वीकारलेल्या महामंडळाने सपशेल माघार घेत आपल्या कर्तव्याशीदेखील प्रतारणा चालविली आहे. गेल्या तीन वर्षांपासून शहरातील प्रवाशांना वेठीस धरून महामंडळाने आपल्या उत्पन्नात कोणती मोठी वाढ केली याचे उत्तरदेखील त्यांच्याकडे नाही.स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या शहरात इलेक्ट्रॉनिक्स बससेवा अािण मेट्रा बससारख्या प्रकल्पाची चर्चा होत असताना पराभूत मानसिकता स्वीकारलेल्या एसटी महामंडळाने आपली सेवा स्मार्ट करण्याचे सोडून प्रवासी वाहतुकीच्या व्यवसायातूनच माघार घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. केवळ महापालिकेकडे बोट दाखवून महामंडळ आपल्यातील कमतरता लपवू पाहत आहे हेच यातून दिसून येते. गेल्या तीन वर्षांत तब्बल ८० ते ८५ महापालिकेशी पत्रव्यवहार करणाºया राज्य परिवहन महामंडळाने अनेकदा पत्राद्वारे थेट प्रवाशांना वेठीस धरण्याचीच भाषा केलेली आहे. तीन वर्षांपूर्वी म्हणजे ३१ डिसेंबर, १ मे आणि १५ आॅगस्ट या दिवशी शहरातील बसेस संपूर्णपणे बंद करण्याचा इशारा देऊन झालेला आहे. त्याचप्रमाणे अनेक मार्गावरील बसफेºया अचानक बंद करून विद्यार्थी आणि कामगारांचे हाल करण्यात आले. महामंडळाच्या या निर्ढावलेल्या भूमिकेमुळे संपूर्ण शहराची प्रवासी वाहतूक आजही विस्कळीत आहे. कोणतीही सेवा आणि सुविधांबाबत चर्चा करताना सामंज्यस्याने तोडगा काढण्यासाठीची चर्चा होऊ शकते. महामंडळाने अशी भूमिका दाखविणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात महापालिका अगदी ‘पहिली’पासून प्रवासी सेवेत उतरणार असल्यामुळे जर महामंडळाने काही बसेस आम्ही सुरू करतो, काही महापालिकेने सुरू कराव्यात, अशी भूमिका घेतली असती तर कदाचित शहराची बसेसेवा मूर्तरुपात येऊ शकली असती. परंतु महामंडळच या संपूर्ण प्रकारात सामंज्यस्याची भूमिका कधीच दिसली नाही. महामंडळाच्या वतीने पत्रव्यवहार करणाºया टेबलावरील कर्मचाऱ्यांकडूनदेखील वास्तव निरीक्षण नोंदविणे अपेक्षित आहे. मात्र दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही.मनपाचे नाक दाबण्याचा प्रकारशहरातील बससेवा चालविण्यासाठी महापालिकेवर सातत्याने दबाव टाकणाºया महामंडळाने अनेकदा महापालिकेकडे आर्थिक तोटा भरून देण्याची मागणी केलेली आहे. तोटा देणार नसेल तर शहर बसेस चालवाव्यात आणि असा दबाव महापालिकेवर टाकण्यात आलेला आहे. याशिवाय महापालिकेकडून वसूल करण्यात येणारे विविध प्रकारचे कर माफ करावेत, जसे तडजोडीची भूमिकादेखील महामंडळाने घेतलेली आहे. दोन्हीतून एक काहीतरी करा तरच बससेवेची जबाबदारी घेण्याचा पवित्रा महामंडळाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.

टॅग्स :state transportएसटीNashikनाशिक