शहरं
Join us  
Trending Stories
1
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
4
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
5
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
6
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
7
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
8
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
9
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
10
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
11
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
12
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
13
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
14
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?
15
ITR चुकला? घाबरू नका, 'या' तारखेपर्यंत भरा बिलिटेड रिटर्न; पण, इतका दंड आणि व्याज भरावे लागणार
16
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
17
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
18
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
19
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
20
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?

रितेश देशमुखसोबत अभिनयाची इच्छा महागात

By admin | Updated: June 22, 2017 00:14 IST

व्यावसायिकाच्या मुलीची तब्बल साडेनऊ लाख रुपयांची फसवूणक करणाऱ्या तोतया चित्रपट दिग्दर्शकासह त्याच्या पत्नीवर मुंबई नाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : बॉलिवूडमधील सिनेअभिनेता रितेश देशमुखसोबत चित्रपटात काम मिळवून देण्याच्या बहाण्याने हॉटेल व्यावसायिकाच्या मुलीची तब्बल साडेनऊ लाख रुपयांची फसवूणक करणाऱ्या तोतया चित्रपट दिग्दर्शकासह त्याच्या पत्नीवर मुंबई नाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ हर्षद ऊर्फ हॅरी आनंद सपकाळ (२१) असे या तोतया चित्रपट दिग्दर्शकांचे नाव असून, त्यास पोलिसांनी अटक केली असून, शनिवार (दि. २४) पर्यंत पोलीस कोठडी देण्ययात आली आहे. दरम्यान, नाशिक शहरच नव्हे तर राज्यभरातील अनेक तरुणींची सपकाळने आर्थिक फसवणूक केली आहे.पाथर्डी फाटा येथे आलिशान व महागडा फ्लॅट भाडेतत्त्वावर राहणारा तोतया दिग्दर्शक हर्षद सपकाळ हा सोशल मीडियावरील व्हॉट््स अ‍ॅप, फेसबुक याद्वारे बॉलिवूडमधील सिने अभिनेता रितेश देशमुखसह अनेक नामांकित अभिनेते, अभिनेत्री तसेच दिग्दर्शकांसोबत ओळख असून, चित्रपटात काम मिळवून देतो अशी मार्केटिंग करीत असे़ केवळ चित्रपटच नव्हे तर मॉडेलिंग क्षेत्रातही संधी देण्याचे आमिष त्याने दाखविले होते़ सोशल मीडियावरील ही जाहिरात शहरातील हॉटेल व्यावसायिक शरद पाटील यांच्या मुलीपर्यंत पोहोचली़ पाटील यांच्या मुलीला अभिनयात रुची असल्याने ती वडिलांना संशयित हर्षदबाबत माहिती दिली़ हर्षदने पाटील यांच्याशी ओळख वाढवत परदेशात फिल्मचे शूटिंग सुरू असल्याची थाप मारली़ तसेच मुलीला रितेश देशमुखसोबत चित्रपटात काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून डिसेंबर २०१६ पासून त्यांच्याकडून तब्बल नऊ लाख २८ हजार रुपये उकळले़ यानंतर मुलीच्या कामाबाबत विचारणा करताच तो टाळाटाळ तसेच मोबाइल बंद ठेवू लागला़ यादरम्यान पाटील यांनी अधिक चौकशी करताच त्याने आतापर्यंत सुमारे दहा ते बारा जणांना प्रत्येकी पाच ते वीस लाखांपर्यंत फसवणूक केल्याचे समोर आले़ पाटील पोलिसांकडे जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर हर्षद फरार झाला होता़; मात्र पाटील यांनी त्यांच्या सहकाऱ्यासमवेत तसेच पोलिसांच्या मदतीने मुंबई, गोवा, पुणे या ठिकाणी त्याचा शोध घेत होते़ पुण्यातील कोथरूड येथे एका मित्राच्या घरात लपलेल्या हर्षदची माहिती मिळताच पाटील व त्यांच्या नातेवाइकांनी त्याच्यावर नजर ठेवली़ मंगळवारी (दि़२०) हर्षद पुण्याहून नाशिकला खासगी बसने निघाला असता पाळतीवर असलेल्या त्यांच्या नातेवाइकाने त्याच्यासमवेत प्रवास करून दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास तो द्वारकेला उतरला असता त्यास पोलिसांच्या ताब्यात दिले़