शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकचे कमाल-किमान तपमान वाढल्याने थंडी गायब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 21:16 IST

फेबु्वारी महिना उजाडल्यापासून शहराच्या हवामानात बदल होऊ लागला आहे. एक तारखेपासून कमाल तपमानाबरोबर किमान तपमानाचा पाराही चढता राहिल्यामुळे शहरातून थंडीची तीव्रता कमी होऊ लागली.

ठळक मुद्दे शुक्रवारी (दि.२) कमाल तपमान ३२ अंशांपर्यंत सोमवारी कमाल तपमान ३२.७

नाशिक : मागील तीन दिवसांपासून कमाल-किमान तपमानाचा पारा वाढू लागल्याने शहरामधून थंडी हळूहळू गायब होत असल्याचा अनुभव नाशिककरांना येऊ लागला आहे. सोबत उन्हाचा चटकाही जाणवू लागला आहे. सोमवारी कमाल तपमान ३२.७, तर किमान तपमान १२.२ इतके नोंदविले गेले.फेबु्वारी महिना उजाडल्यापासून शहराच्या हवामानात बदल होऊ लागला आहे. एक तारखेपासून कमाल तपमानाबरोबर किमान तपमानाचा पाराही चढता राहिल्यामुळे शहरातून थंडीची तीव्रता कमी होऊ लागली. दोन दिवसांपर्यंत रात्रीच्या वेळी हवेत गारवा जाणवत होता; मात्र कमाल तपमानासह किमान तपमानही १२ अंशांपर्यंत वाढल्यामुळे रात्रीदेखील थंडीची तीव्रता दोन दिवसांपासून जाणवत नाही. एकूणच थंडीने शहरातून काढता पाय घेतल्याची स्थिती आहे. शुक्रवारी (दि.२) कमाल तपमान ३२ अंशांपर्यंत, तर किमान तपमान १०.६ अंश इतके नोंदविले गेले होते. शनिवारी कमाल तपमान ०२ अंशांनी, तर किमान तपमानात एक अंशाने वाढ झाली. सोमवारी मात्र किमान तपमान थेट १२ अंशांच्या पुढे गेले, तर कमाल तपमानाचा पारा जवळपास ३३ अंशांपर्यंत सरकला. यामुळे सोमवारी थंडी पहाटे व रात्री अत्यल्प स्वरूपात जाणवली. एकूणच थंडीची तीव्रता कमी झाल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरच्या आठवडा थंडीने चांगलाच गाजवला. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम झाला होता. सर्दी-पडसे, खोकल्याचे रुग्ण वाढले होते.

टॅग्स :TemperatureतापमानNashikनाशिक