शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

विजयापासून ‘वंचित’, पण शिवसेनेला सूचक इशारा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 1:11 AM

तब्बल चाळीस वर्षांपासून शिवसेनेचा गड राहिलेल्या देवळाली विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने आघाडी मिळवली आणि बालेकिल्ला शाबुत ठेवला खरा, परंतु याठिकाणी वंचित आघाडीने मारलेली मुसंडी मात्र विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सूचक इशारा ठरली आहे

तब्बल चाळीस वर्षांपासून शिवसेनेचा गड राहिलेल्या देवळाली विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने आघाडी मिळवली आणि बालेकिल्ला शाबुत ठेवला खरा, परंतु याठिकाणी वंचित आघाडीने मारलेली मुसंडी मात्र विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सूचक इशारा ठरली आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत बालेकिल्ल्याला धडक बसणार यादृष्टीने आत्तापासून नियोजन करावे लागणार आहे.गेल्या काही वर्षांत निवडणुकांची परिमाणे बदलत आहेत. त्यात प्रस्थापितांना धक्के सहन करावे लागत आहेत. त्यात गेल्या वर्षी भीमा कोरेगावच्या घटनेनंतर डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी नवा पर्याय उभा केला आहे. एमआयएमची त्यांना साथ मिळाल्याने दलित मुस्लीम मतदारांचे ध्रुवीकरण त्यांनी करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमामुळेच वंचितचा प्रभाव यंदा नाशिक मतदारसंघात जाणवला आणि या पक्षाच्या उमेदवाराने १ लाख ९ हजार ९८१ अशी मते मिळविली आहेत.लोकसभा निवडणुकीत देवळाली मतदारसंघात २ लाख ६३ हजार ७०९ या एकूण मतदारांपैकी १ लाख ६० हजार १५० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. म्हणजेच ६०.७३ टक्के इतके मतदान झाले होते. त्यातील ८० हजार ६८८ मतदान हे युतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना झाले आहे, तर राष्टÑवादीचे समीर भुजबळ यांना त्यांच्या पन्नास टक्के म्हणजे ४८ हजार ७५५ इतकी मते मिळाली आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पवन पवार यांना २४ हजार ४५९ इतकी मते मिळाली आहेत.सेनेला सूचक इशारापूर्वाश्रमीचा नाशिकरोड-देवळाली मतदारसंघ असल्यापासूनच शिवसेना या मतदारसंघात मुरलेली आहे. त्यातच बबनराव घोलप यांच्यासारखा उमेदवार गवसल्यानंतर केवळ शिवसेना नव्हे, तर व्यक्तिगत घोलप यांचादेखील हा बालेकिल्ला राहिला आहे. नाशिकरोड-देवळाली हा अनुसूचित जमातीसाठी राखीव मतदारसंघ आहे. त्यामुळे त्याठिकाणी सर्व समाजाला जो बरोबर घेऊन चालेल अशाच्या बाजूने यश राहते हे घोलप यांनी वेळोवेळी सिद्ध केले आहे. स्वत: घोलप शिवसेनेचे उमेदवार नसले तरी गेल्यावेळी त्यांनी त्यांचे सुपुत्र योगेश घोलप यांना निवडून आणले. त्यामुळे हा मतदारसंघ फक्त आणि फक्तशिवसेनेच्या पाठीशी असल्याचे चित्र आजवर निर्माण झाले होते, परंतु यंदा वंचित बहुजन आघाडीच्या प्रभावामुळे हा मतदारसंघ सेनेला वाटेल तेवढा सोपा राहिलेला नाही. साधारणत: विद्यमान आमदाराला उमेदवारी नाकारली जात नाही हे खरे असले तरी उमेदवारी मिळाली म्हणजे विजय इतके सोपेही समीकरण नसेल. ज्या दलित मतांचा घोलप यांना मोठा आधार आहे, त्यात वंचित आघाडीने विभागणी केली तर ती बाब सोपी नाही.याशिवाय घोलप यांनी विधानसभेत सातत्याने यश मिळविले असले तरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत म्हणजे जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पराभवदेखील पत्करावा लागला आहे, त्यामुळे घोलप म्हणजे सबकुछ अशीही अवस्था नाही. त्यामुळेच सेनेच्या दृष्टीने हा सूचक इशारा मानला जात आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालnashik-pcनाशिक