शहरं
Join us  
Trending Stories
1
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
2
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
3
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
4
Team India Sponsor Deal : टीम इंडियाला पहिला स्पॉन्सर कधी मिळाला? कसा वाढत गेला कमाईचा आकडा?
5
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...
6
विपिन रात्रभर डिस्कोला जायचा अन्...; निक्की मर्डर केसमध्ये 'मिस्ट्री गर्ल'ची एन्ट्री
7
Dream11चं 'पॅक-अप'; आता टीम इंडियाचा नवा स्पॉन्सर कोण? 'या' बड्या कंपन्यांची नावे चर्चेत
8
Nikki Murder Case : फक्त हुंडा नाही तर रील, पार्लरवरुनही झालेली भांडणं; निक्की हत्याप्रकरणात धक्कादायक खुलासा
9
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
10
गणेश चतुर्थी २०२५: युट्यूब, फेसबुक Live, रेकॉर्डेड गणपती पूजन पुण्य देते का? पूजा सफल होते?
11
PM मोदी उद्या करणार उद्घाटन; Maruti च्या पहिल्या EV कारची शंभरहून अधिक देशात निर्यात
12
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
13
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
14
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
15
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
16
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
17
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल
18
आता फक्त ३ मिनिटांत भरा ITR! 'या' कंपनीने लॉन्च देशातील पहिला AI प्लॅटफॉर्म; अंतिम मुदतही वाढली
19
Nikki Murder Case : "दोन्ही जावई मुलींच्या पार्लरमधून पैसे चोरायचे, काहीच काम करत नव्हते"; ढसाढसा रडले वडील
20
Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?

३१ हजार देशी-विदेशी पाहुण्यांची मांदियाळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : निफाड तालुक्यातील चापडगाव येथील रामसर दर्जाच्या नांदुरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यातील जलाशयावर सध्या देशी-विदेशी स्थलांतरित पाहुण्यांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : निफाड तालुक्यातील चापडगाव येथील रामसर दर्जाच्या नांदुरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यातील जलाशयावर सध्या देशी-विदेशी स्थलांतरित पाहुण्यांचा मेळा भरला आहे. थंडीचा कडाका मागील पंधरवड्यापासून वाढल्याने कोरोनासोबतच ‘बर्ड फ्ल्यू’सारख्या आजाराचे सावट झुगारत पक्षी तीर्थावरील ‘हिवाळी संमेलन’ चांगलेच बहरलेले दिसून येत आहे. पाणथळ अधिवासात राहणाऱ्या ७१ प्रजातींच्या पक्ष्यांची येथे नुकतीच नोंद करण्यात आली आहे.

कोरोनाच्या सावटामुळे नांदुरमध्यमेश्वरचे दरवाजे यावर्षी उशिराने खुले करण्यात आले. या हंगामातील पाचवी मासिक पक्षी प्रगणना नाशिक वन्यजीव विभागाकडून नुकतीच करण्यात आली. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या पक्षी तज्ज्ञांनी घेतलेला सहभाग हे यंदाच्या पक्षी गणनेचे वैशिष्ट्य होते. अभयारण्य क्षेत्रातील चापडगाव, मांजरगाव, खानगावथडी, कोठुरे, कुरुडगाव, काथरगाव शिवारात तसेच गोदावरीच्या पात्रांभोवती वनरक्षकांसह, स्थानिक गाईड, पक्षीमित्र, वन्यजीव अभ्यासकांनी यात सहभाग घेतला. पक्षी निरीक्षणा दरम्यान पाणस्थळावरील विविध पाणपक्षी, गवताळ प्रदेश तसेच झाडांवरील पक्ष्यांच्या नोंदी करण्यात आल्या. दरम्यान, ७१ प्रजातींच्या सुमारे ३१ हजार ६७७ पाणस्थळी पक्ष्यांचे संमेलन चांगलेच रंगल्याचे यावेळी दिसून आले. बर्ड फ्ल्यू आजाराचे सावट असले तरीदेखील नांदुरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यातील देशी-विदेशी स्थलांतरित पक्षी मात्र अद्याप या आजारापासून सुरक्षित असल्याने हे शुभ वर्तमान मानले जात आहे. पक्ष्यांच्या हालचालींवर वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून करडी नजर ठेवली जात आहे. सहायक वनसंरक्षक भरत शिंदे, वनपाल अशोक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अभयारण्य क्षेत्रातील पक्ष्यांची गणना पूर्ण करण्यात आली.

---इन्फो--- पाणथळी पक्ष्यांचे माहेरघर

नांदुरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्य हे पाणथळी पक्ष्यांचे आशियाई मार्गातील महत्त्वाचे ‘माहेरघर’ आहे. सध्या येथे सामान्य करकोचा, उघड्या चोचीचा करकोचा, वारकरी, जांभळा बगळा, राखी बगळा तसेच स्थलांतरित बदकांपैकी स्पॉट बिल डक, तरंग, चक्रवाक, गढवाल, भुवई, लालशिरी यासह चमचा (स्पून बिल), कमळपक्षी, शेकाट्या, नदी सुरय, चित्रबलाक यांच्यासह मार्श हॅरियर, ऑस्प्रे ईगलसारखे शिकारी पक्षीही बागडताना पाहायला मिळत आहेत.

---इन्फो--

‘बीएनएचएस’कडून पक्षी अभ्यासाचे धडे

नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यातील वनरक्षक, गाईड, पक्षीप्रेमी, स्वयंसेवक, वनरक्षक यांना बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या सहकार्याने नाशिक वन्यजीव विभागाकडून पक्षी अभ्यासाविषयीचे धडे देण्यात आले. पाच दिवसीय या कार्यशाळेत सोसायटीचे डॉ. राजू कसांबे, पक्षीतज्ज्ञ तुहिना कट्टी, नंदकिशोर दुधे, प्रियंका जुंदरे आदींनी नांदुरचे पाणथळ, गवताळ अधिवासाचे महत्त्व, पक्षी निरीक्षण, पक्षी ओळख, रामसर पाणथळी जागांचे महत्त्व, बर्ड रिंगिंग, बँडिंग, प्रगणना, माळरानातील पक्षीजीवन, रानपिंगळ्याचा पुनर्शोध अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

---

फोटो आरवर ०१बर्ड / बर्ड१/बर्ड२/बर्ड३