शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 01:08 IST

नाशिक : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील विविध मराठा संघटनांनी बुधवारी (दि़२५) बंदची हाक दिली असून, या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी, तर ग्रामीणमध्ये पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे़ संपूर्ण जिल्ह्यात सकाळी ६ वाजेपासून हा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे़  नाशिक शहरात पोलीस ...

नाशिक : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील विविध मराठा संघटनांनी बुधवारी (दि़२५) बंदची हाक दिली असून, या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी, तर ग्रामीणमध्ये पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे़ संपूर्ण जिल्ह्यात सकाळी ६ वाजेपासून हा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे़  नाशिक शहरात पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त व सहायक पोलीस आयुक्त आपापल्या भागामध्ये लक्ष ठेवून असणार आहे़ शहरातील प्रत्येक पोलीस ठाणेनिहाय बंदोबस्त लावण्यात आला असून, बसडेपो, अत्यावश्यक सेवा, नदीवरील पूल या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे़  याबरोबरच शहरातील मुख्य चौकात पॉर्इंट तयार करण्यात आले असून, त्या ठिकाणी बंदोबस्त तैनात असणार आहे़ याबरोबरच कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी दंगल नियंत्रण पथक, शीघ्र कृती दल तैनात असणार आहे़नाशिक ग्रामीणमध्येही बंदोबस्तही तैनात करण्यात आले असून, ठिकठिकाणी फिक्स पॉर्इंट, पेट्रोलिंग, महामार्गावर स्ट्रायकिंग ठेवण्यात आले आहेत़ याबरोबरच दंगल नियंत्रण पथक, शीघ्र कृती दल, राज्य राखीव दलाची एक प्लाटून तैनात असणार आहे़ दरम्यान, कायदा सुव्यवस्था तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे़

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाPoliceपोलिस