सिन्नर : कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर करण्यातआला असून, वाढत्या संसर्गाच्या भीतीमुळे परप्रांतीय मजुरांनी आपापल्या गावाकडे जाणे पसंत केले आहे. गेल्या दोन महिन्यापासून शेकडोंच्या संख्येने या कामगारांच्या झुंडी मिळेल त्या वाहनाने आणि अगदी पायीसुद्धा रवाना झाल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात उद्योग-व्यवसाय क्षेत्रात या कामगारांची कमतरता जाणवणार आहे.राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या समृद्धी महामार्गालादेखील कामगारांच्याया स्थलांतराची मोठी झळ बसणार आहे. सिन्नर तालुक्यात दोनटप्प्यात सुरू असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामावरील शेकडो कामगार, मजूर आपल्या मूळगावी परतल्यामुळे आगामी काळात ठेकेदार कंपन्यांना स्थानिकांना प्राधान्य देऊन कामे पूर्ण करावी लागणार आहेत.सिन्नर तालुक्यात दोन टप्प्यात समृद्धी महामार्गाचे काम सुरूआहे. यासाठी दोन वेगवेगळ्या कंपन्यांची नियुक्ती करण्यातआली आहे. या कंपन्या उत्तर भारतातील असून, त्यांनी कामासाठी आवश्यक असणाºया तांत्रिक व अकुशल कामगारांचा संपूर्ण लवाजमा आपापल्या राज्यातून याठिकाणी आणला आहे.मात्र, कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे यातील बहुसंख्य कामगारांनी आपल्या मूळगावी जाणे पसंत केले आहे. नोकरीला सोडचिठ्ठी देत हे कामगार आपल्या गावाकडे परतले असून, अशा कामगारांची संख्या दखल घेण्याजोगी आहे. या कामगारांच्या स्थलांतरामुळे साहजिकच समृद्धी महामार्गाचे काम मंदावले आहे.-------------------------------सिन्नरमधील कारखान्यांमध्ये कामे पूर्ण करण्यासाठी दमछाक होणार सिन्नरमध्ये काम करणाºया दोन्ही कंपन्यांकडे हजारो कामगार असून, त्यात ट्रक ड्रायव्हर व मशीन आॅपरेटरची संख्या अधिक आहे. या सर्व कामगारांना मासिक पगारावर व राहणे, जेवण मोफत देण्याच्या अटीवर आणण्यात आले होते. कोरोना संसर्ग वाढल्याने व महाराष्ट्र राज्यात त्याची झळ सर्वाधिक असल्याने या परप्रांतीय कामगारांना त्यांच्या कुटुंबाकडून गावी परत येण्याचे बजावण्यात आले. त्यामुळे हातात असणाºया नोकरीवर लाथ मारून या कामगारांनी भीतीपोटी घर जवळ केले आहे. ४गेल्या दोन आठवड्यात या दोन्ही कंपन्यांमधून शेकडोच्या संख्येने कामगार एकाच वेळी बाहेर पडल्याचे समजते. मिळेल त्या वाहनांनी किंवा अगदी पायीसुद्धा प्रवास या कामगारांनी केला असून बहुतेक जण आपापल्या गावी परतले आहेत. स्थलांतरामुळे या दोन्ही कंपन्यांना भविष्याची चिंता आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण होणे शक्य नसले तरी हाती असलेली कामे पूर्ण करण्यासाठी या कंपन्यांची दमछाक होणार आहे. अर्थात त्यासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ आता स्थानिक पातळीवर उपलब्ध करून घेण्याचा निर्णय झाला आहे.
कामगार गेल्याने स्थानिकांना प्राधान्य द्यावे लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 23:28 IST