शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

वावी ते श्री क्षेत्र मढी पदयात्रेचे सोमवारी प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 17:54 IST

सिन्नर : रंगपंचमीच्या दिवशी पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथे भरणाऱ्या श्री कानिफनाथ महाराज यात्रोत्सवासाठी सिन्नर तालुक्यातल्या वावी येथून पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रंगपंचमीच्या यात्रेसाठी सोमवारपासून (दि.९) पदयात्रेचे आयोजन करण्यात आहे. या पदयात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

वावी गावचे आराध्य दैवत असलेल्या कानिफनाथ महाराज यांचा यात्रोत्सव श्रीक्षेत्र मढी येथे रंगपंचमीच्या दिवशी भरतो. रंगपंचमीच्या यात्रोत्सवासाठी दरवर्षी येथून होळी(धुलीवंदन) ते रंगपंचमी या काळात पदयात्रेचे आयोजन करण्यात येते. रंगपंचमीला भरणा-या यात्रेसाठी येथून सुमारे ७०० हून अधिक नाथभक्त पायी दिंडीने श्रीक्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथे जातात. येत्या सोमवार ते शुक्रवारपर्यंत जाणाºया या पदयात्रेसाठी तयारी झाली आहे. यात्रोत्सवात सहभागी होणारा रथ सजविण्यात आला आहे. पदयात्रेसाठी युवकांमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे. सुमारे ५० वर्षांपासून परंपरेने चालत आलेल्या या रंगपंचमी सोहळ्याच्या पदयात्रेत गेल्या २० वर्षांपासून भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लोणी, कोल्हार, सोनई, शनिशिंगणापूर, टाकळीमियाँ, मिरी, तिसगाव या मार्गे जाणा-या पदयात्रेत भक्त दररोज ४० किलोमीटर अंतर पायी चालतात. या पदयात्रेसोबत पिण्याच्या पाण्याचा टँकर, ट्रॅक्टर, टेम्पो आदि वाहने असतात. रविवारी (दि. ८) रोजी सकाळी ९ वाजता कोपरगाव आश्रमाचे प. पू. दत्तगिरी महाराज यांच्या हस्ते रथ, ध्वज व पालखी पूजन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी श्री कानिफनाथ महाराज रथाची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. सोमवार (दि. ९) रोजी दुपारी दिंडीचे प्रस्थान होणार आहे. रंगपंचमीच्या दिवशी श्री क्षेत्र मढी येथे भरणा-या यात्रेला  लाखो भाविक हजेरी लावतात. यात्रोत्सवात वावीच्या काठीला विशेष मान असतो. वाजत गाजत मिरवणुकीने जाऊन काठीला कळसाचे दर्शन घडवून आणले जाते. या पदयात्रेच्या समितीने मढी (ता. पाथर्डी) येथे मुक्कामासाठी जागा विकत घेतली असून या ठिकाणी पायी जाणारे नाथभक्त जाऊन विसावतात. या पदयात्रा काळात तिसगाव, सोनई, टाकळीमिया आदि गावांसह गावोगावी रथपूजन करण्यात येऊन गावातून रथाची सवाद्य मिरवणूक काढण्यात काढून जल्लोषात स्वागत करण्यात येते. सोमपासून निघणा-या या पदयात्रेमुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पदयात्रेत जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन पदयात्रा संयोजक श्री कानिफनाथ मित्रमंडळ व ग्रामस्थांनी केले आहे. 

टॅग्स :Socialसामाजिक