शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

मढी पदयात्रेसाठी आज प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 23:23 IST

सिन्नर : रंगपंचमीच्या दिवशी पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथे भरणाऱ्या श्री कानिफनाथ महाराज यात्रोत्सवासाठी सिन्नर तालुक्यातील वावी येथून पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रंगपंचमीच्या यात्रेसाठी सोमवारपासून (दि.९) पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देदिंडी सोहळा : वावीत रथपूजन व मिरवणूक उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : रंगपंचमीच्या दिवशी पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथे भरणाऱ्या श्री कानिफनाथ महाराज यात्रोत्सवासाठी सिन्नर तालुक्यातील वावी येथून पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रंगपंचमीच्या यात्रेसाठी सोमवारपासून (दि.९) पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.वावी गावचे आराध्य दैवत असलेल्या कानिफनाथ महाराज यांचा यात्रोत्सव श्रीक्षेत्र मढी येथे रंगपंचमीच्या दिवशी भरतो. या यात्रोत्सवासाठी दरवर्षी येथून होळी (धुलीवंदन) ते रंगपंचमी या काळात पदयात्रेचे आयोजन करण्यात येते. रंगपंचमीला भरणाºया यात्रेसाठी येथून सुमारे ७०० हून अधिक नाथभक्त पायी दिंंडीने श्रीक्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथे जातात. येत्या सोमवार ते शुक्रवारपर्यंत जाणाºया या पदयात्रेसाठी तयारी झाली आहे.रविवारी (दि. ८) सकाळी ९ वाजता कोपरगाव आश्रमाचे प. पू. दत्तगिरी महाराज यांच्या हस्ते रथ, ध्वज व पालखी पूजन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी श्री कानिफनाथ महाराज रथाची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. सोमवारी (दि. ९) दुपारी दिंडीचे प्रस्थान होणार आहे.रंगपंचमीच्या दिवशी श्रीक्षेत्र मढी येथे भरणाºया यात्रेला महाराष्टÑातून लाखो भाविक हजेरी लावतात. यात्रोत्सवात वावीच्या काठीला विशेष मान असतो. वाजत गाजत मिरवणुकीने जाऊन काठीला कळसाचे दर्शन घडवून आणले जाते. या पदयात्रेच्या समितीने मढी (ता. पाथर्डी) येथे मुक्कामासाठी जागा विकत घेतली असून, या ठिकाणी पायी जाणारे नाथभक्त जाऊन विसावतात. या पदयात्रा काळात तिसगाव, सोनई, टाकळीमिया आदी गावांसह गावोगावी रथपूजन करण्यात येऊन गावातून रथाची सवाद्य मिरवणूक काढून जल्लोषात स्वागत करण्यात येते. सोमवारपासून निघणाºया या पदयात्रेमुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पदयात्रेत भाविकांना सहभागी होण्याचे आवाहन पदयात्रा संयोजक कानिफनाथ मित्रमंडळ व ग्रामस्थांनी केले आहे.समाधी मंदिर चार दिवस खुलेभटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाºया श्रीक्षेत्र मढी येथील यात्रोत्सव होळी ते गुढीपाडवा असा पंधरा दिवस चालतो. यात्रोत्सवास होळीपासून प्रारंभ होतो. रंगपंचमी व गुढीपाडवा या दोन दिवशी मोठा यात्रोत्सव भरतो. यापूर्वी केवळ गुढीपाडव्याच्या दिवशी समाधी मंदिरात जाऊन भाविकांना दर्शन घेता येत होते. गुढीपाडव्याच्या दिवशी लाखो भाविकांमुळे गर्दी होते. त्यामुळे भाविकांना समाधीचे थेट दर्शन घेता यावे, यासाठी समाधी मंदिर चार दिवस खुले ठेवण्याचा निर्णय संस्थानने घेतला आहे. गुढीपाडव्याच्या काळात समाधी मंदिरात भाविकांना दर्शन घेता येणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकTempleमंदिर