शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय अधिकाऱ्यांचा दणका ; उशिराने कामावर हजर झाल्यास पगार कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:40 IST

महापालिकेच्या वतीने दररोज सकाळ व सायंकाळच्या सुमारास मनपा कर्मचा-यांकडून साफसफाई करण्यात येत असली तरी काही कर्मचारी हे कामचुकारपणा तसेच कामावर उशिराने हजर राहत असल्याचे विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी बुधवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास अचानक सिडको भागातील कर्मचा-यांच्या हजेरीशेडवर जाऊन पाहणी केली.

सिडको : महापालिकेच्या वतीने दररोज सकाळ व सायंकाळच्या सुमारास मनपा कर्मचा-यांकडून साफसफाई करण्यात येत असली तरी काही कर्मचारी हे कामचुकारपणा तसेच कामावर उशिराने हजर राहत असल्याचे विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी बुधवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास अचानक सिडको भागातील कर्मचा-यांच्या हजेरीशेडवर जाऊन पाहणी केली. यात सुमारे १६ कर्मचारी हे उशिराने कामावर आल्याचे लक्षात आले असून, या कर्मचाºयांना तंबी देत यापुढील काळात उशिराने कामावर हजर झाल्यास पगार कपात करणार असल्याचे सांगतले. यातील दोन कर्मचाºयांना नोटीस बजाविण्यात आल्याचे समजते.तत्कालीन मनपा आयुक्तांच्या काळात सर्व ठिकाणी सफाई कर्मचारी दिसत होते; मात्र त्यांची बदली होताच कर्मचारी दिसेनासे झाले असल्याचे चित्र बघावयास मिळाले. यामुळे रस्त्यांवर पुन्हा कचरा दिसू लागल्याने याबाबात नागरिकांनीदेखील नाराजी व्यक्त केली आहे. नवीन आयुक्तांनी नुकताच पदभार स्वीकारला असून, त्यांनीदेखील कामकाजात कसूर करणाºयांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहे. तसेच आयुक्तांनी परिपत्रक काढून कर्मचारी व अधिकाºयांना सूचित केले असून, नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविणे आपले कर्तव्य असून, यात कोणीही कसूर केल्यास त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांनी बुधवारी (दि. १२) सकाळी सहा वाजता अचानक सिडको भागातील सफाई कर्मचाºयांच्या हजेरीशेडवर व्हिजिट मारली. यावेळी त्यांना सुमारे १६ कर्मचारी उशिराने हजर झाल्याचे निदर्शनास आले. अधिकाºयांनी या सर्वांची झाडाझडती घेतली व यातील दोन कर्मचारी हे उशिराने कामावर येत असल्याने त्यांना नोटिसा बजाविल्या. यावेळी प्लॅस्टिकचा वापर करणाºया दुकानदारास पाच हजार रुपयांचा दंडदेखील करण्यात आला आहे.दंडात्मक कारवाईच्या सूचनाविभागीय अधिकाºयांनी सकाळी हजेरीशेडवर पाहणी केल्यानंतर शिवाजी चौक भाजी मार्केटमध्ये पाहणी केली असून, भाजी विक्रे ते हे त्यांना सांगितलेल्या जागेवर न बसता दुसरीकडेच बसत असल्याने त्यांना सूचना केल्या. तसेच परिसरात घाण व कचरा टाकू नये याबाबत प्रबोधन  केले.  याबाबत रस्त्यावर थुंकणे, लघुशंका करणे, अस्वच्छता पसरविणे, रस्त्यावर पाणी सांडणे अशांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना स्वच्छता निरीक्षकांना दिल्या. याप्रकरणी नियमितपणे दक्षता घेऊन कामकाज करण्यात यावे, असेही यावेळी सांगण्यात आले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाEmployeeकर्मचारी