शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

देवळाली कॅम्पला दवाखाना फोडून साहित्य लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 19:01 IST

चोरट्यांनी आता घरांऐवजी कारखाने, गुदामे, दुकाने, दवाखाने लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे.

नाशिक : शहर व परिसरात वाढत्या घरफोड्यांच्या घटनांनी नागरिक संतप्त झाले आहे. चोरट्यांनी आता घरांऐवजी कारखाने, गुदामे, दुकाने, दवाखाने लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत चोरट्यांनी एक दवाखाना फोडून लॅपटॉपसह धातूची गणेशमुर्ती, दिवे लंपास केल्याचे उघडकीस आले आहे.याप्रकरणी अधिक माहिती अशी, चोरट्यांनी येथील डॉ. मेहक विनोद चावला यांचे डेन्टल क्लिनिकला लक्ष्य केले. गुरूद्वारारोडवरील चावला कॉटेज येथे असलेला त्यांचा दवाखाना चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास फोडला. क्लिनीकमध्ये शिरलेल्या चोरट्यांनी लॅपटॉपसह अडीच किलो वजनाची गणपतीची पितळाची धातूची मुर्ती व दिवा असा सुमारे २७ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याबाबत अधिक तपास हवालदार पाडवी करीत आहेत.आडगावला ८० हजारांची घरफोडीनाशिक : नांदूरनाका लिंकरोड वरील इच्छामणी नगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ८० हजारांचा ऐवज चोरून नेला. त्यात रोकडसह सोन्या-चांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भुषण भाऊसाहेब राहणे (रा. शांताबाई निवास) यांनी याप्रकरणी तक्र ार दाखल केली आहे. राहणे कुटूंबिय १९ ते २६ जुलै दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील ४५ हजाराची रोकड आणि सोन्याचे दागिणे असा ८० हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याचे फिर्यादित म्हटले आहे. 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयRobberyचोरीtheftचोरी