शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

पुढील वर्षापासून दातांचाही विमा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 05:05 IST

नाशिकमध्ये शुक्रवारपासून राज्य डेंटल असोसिएशनचे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.

- धनंजय रिसोडकर नाशिक : आरोग्य विम्यात शरीरातील प्रत्येक लहान-मोठ्या अवयवांचा समावेश असताना केवळ मौखिक आरोग्याचा विमा अर्थात दातांचा विमा काढण्याची मुभा नव्हती. मात्र, इंडियन डेंटल असोसिएशनच्या वतीने देशातील दोन विमा कंपन्यांशी त्यासंदर्भात चर्चा झाली असून, पुढील वर्षापासून दातांच्या विम्याचीही सुविधा नागरिकांना उपलब्ध होऊ शकणार आहे.

नाशिकमध्ये शुक्रवारपासून राज्य डेंटल असोसिएशनचे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित परिषदेचे अध्यक्ष डॉ. संजय भावसार यांच्याशी झालेल्या संवादात त्यांनी ही माहिती दिली. कोणत्याही कंपनीच्या मेडिक्लेममध्ये दातांच्या विम्याचा भाग नसतो. केवळ अपघात झाला आणि त्यात तुमचे दात पडले किंवा दातांची तुटफूट झाली तरच त्या विम्याच्या रकमेत त्यावर उपचार होतात. ही आतापर्यंतची संकल्पना असून, त्याव्यतिरिक्त दातांचा विमा किंवा भरपाई मिळण्याची कोणतीही तरतूद मेडिक्लेममध्ये नसल्याचे भावसार यांनी नमूद केले.

कॉस्मेटिक ट्रीटमेंट मानण्याची प्रथा

मुळात डेंटल ट्रीटमेंट ही जीवनावश्यक बाब न मानता ती कॉस्मेटिक ट्रीटमेंटचा भाग गणली जाते. त्यामुळे दातांवरील उपचार हे सौंदर्यासाठी अशा विपरीत व्याख्येत बसविण्यात आले असल्यामुळेच दातांचा किंवा मौखिक आरोग्याचा विमा नावाची संकल्पना अस्तित्वात येऊ शकली नव्हती. भारतातील एका आघाडीच्या विमा कंपनीने गतवर्षी तीन महिने प्रायोगिक तत्त्वावर दंत विम्याबाबतचा प्रयोग केला होता. त्यातील काही तरतुदी अयोग्य वाटल्याने त्यांनी तो विम्याचा प्रयोग तात्पुरता बाजूला ठेवला होता. मात्र, पुढील वर्षापासून ती कंपनीदेखील दंत आरोग्य विम्याबाबत सकारात्मक विचार करू शकते.

टॅग्स :Dental Care Tipsदातांची काळजीdoctorडॉक्टरNashikनाशिकMaharashtraमहाराष्ट्र