शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूचा ससेमिरा कायम ; रुग्णसंख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:36 IST

शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढच होत असून, नोव्हेंबर महिन्यात २४ दिवसांत १८१ रुग्णांना लागण झाल्याचे आढळून आले आहे, तर संशयितांची संख्या ६४५ वर जाऊन पोहोचली आहे. डेंग्यूचा ससेमिरा कायम असल्याने नाशिककरांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाºया रुग्णांची संख्या अधिक आहे.

ठळक मुद्देनोव्हेंबर महिन्यात २४ दिवसांत १८१ रुग्णांना लागण नाशिककरांमध्ये घबराटीचे वातावरणसंशयित रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढच

नाशिक : शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढच होत असून, नोव्हेंबर महिन्यात २४ दिवसांत १८१ रुग्णांना लागण झाल्याचे आढळून आले आहे, तर संशयितांची संख्या ६४५ वर जाऊन पोहोचली आहे. डेंग्यूचा ससेमिरा कायम असल्याने नाशिककरांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाºया रुग्णांची संख्या अधिक आहे.  शहरात यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्णसंख्येत ३० ते ३५ टक्के घट झाल्याचा दावा महापालिकेचा आरोग्य-वैद्यकीय विभाग करत असला तरी डेंग्यू आजाराने बाधित झालेल्या संशयित रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढच होताना दिसून येत आहे. शहरात आॅगस्टमध्ये ९७ डेंग्यूचे रु ग्ण सापडले होते. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात रुग्णसंख्या १०५ वर जाऊन पोहोचली होती.  आॅक्टोबर महिन्यात सर्वाधिक २४८ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे, तर संशयित डेंग्यू रुग्णांचा आकडा ४७७ पर्यंत पोहचला. आता १ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत संशयित रुग्णांची संख्या ६४५ वर जाऊन पोहोचली असून, १८१ रुग्णांना लागण झालेली आहे. डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. प्रामुख्याने, शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहेत. संबंधित रुग्णालयांना डेंग्यूच्या आजाराने बाधित दाखल रुग्णांची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला कळविणे बंधनकारक आहे. परंतु, अनेक रुग्णालये त्याबाबतची माहिती कळवत नसल्याने वैद्यकीय विभागाने नोटिसा बजावण्याची तयारी चालविली आहे.प्लेटलेट्सला मागणी डेंग्यूच्या रुग्णामध्ये रक्तातील प्लेटलेट््सची संख्या कमालीची घटत असते. सर्वसाधारणपणे २० हजारांच्या आत प्लेटलेट्स आल्यास रुग्णाच्या जिवाला धोका पोहोचू शकतो. सद्यस्थितीत शहरातील रक्तपेढ्यांमध्ये प्लेटलेट्सला मागणी वाढली आहे. प्लेटलेट्सच्या पिशव्यांची किंमत ही १० हजारांच्या पुढे जात असल्याने डेंग्यूचा उपचार महागडा ठरू लागला आहे. नुकत्याच झालेल्या महासभेत गजानन शेलार यांनी डेंग्यूच्या रुग्णांना महापालिकेने आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली होती.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाdengueडेंग्यू