शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक शहरात डेंग्यूचा प्रभाव ओसरला, स्वाइन फ्ल्यूही हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 18:50 IST

डेंजर झोनमधून बाहेर : मनपाकडून उपाययोजना सुरुच

ठळक मुद्देपंधरा दिवसात संशयित ३३ रुग्णांपैकी ८ जणांना डेंग्यूची लागण सन २०१७ मध्ये वर्षभरात २१६८ संशयितांपैकी ९४१ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याची नोंद

नाशिक - गेल्या तीन वर्षांपासून शहरात धुमाकूळ घालणा-या डेंग्यूच्या आजाराचा प्रभाव आता ओसरत चालला असून गेल्या पंधरा दिवसात संशयित ३३ रुग्णांपैकी ८ जणांना डेंग्यूची लागण झालेली आहे. डेंग्यूच्या डेंजर झोनमधून नाशिक बाहेर पडले असले तरी महापालिकेने मात्र आपल्या स्तरावर उपाययोजना चालू ठेवली आहे.गेल्या तीन वर्षांपासून नाशिक शहर डेंग्यूच्या विळख्यात अडकले होते. मुंबई-पुण्यानंतर नाशिक ‘डेंग्यू’च्या डेंजर झोनमध्ये होते. महापालिकेकडे असणारा कर्मचा-यांचा अभाव व पेस्ट कंट्रोलबाबत वाढत्या तक्रारी यामुळे डेंग्यूवर नियंत्रण मिळविणे अवघड होऊन बसले होते. डिसेंबर २०१७ मध्ये डेंग्यूचे ३७४ संशयित रुग्ण आढळून आले. त्यातील १६९ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निदर्शनास आले होते. नोव्हेंबर महिन्यात ६४४ संशयितांपैकी २७६ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निदर्शनास आले होते. सन २०१७ मध्ये वर्षभरात २१६८ संशयितांपैकी ९४१ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याची नोंद महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या दप्तरी आहे. मात्र, गेल्या १५ दिवसांपासून डेंग्यूच्या रुग्णसंख्येत कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे. १५ दिवसात ३३ संशयितांचे रक्तनमुने तपासले असता त्यातील ८ रुग्णांना डेंग्यूची लागण झालेली आहे. वातावरणातील बदलाचाही त्यावर परिणाम दिसून येत आहे. डेंग्यूचा प्रभाव ओसरत चालला असला तरी, महापालिकेकडून मात्र घरोघरी प्रबोधनपर मोहीम सुरुच असून एडीस जातीच्या डासांच्या अळ्या नष्ट करण्याची कार्यवाही सुरु आहे. सध्या शहरात ठिकठिकाणी नवीन बांधकामांनाही वेग आला आहे. त्यामुळे महापालिकेने बांधकामांच्या ठिकाणीही जाऊन तपासणी मोहीम हाती घेतली असून डासांच्या अळ्या आढळून आल्यास संबंधितांना नोटीसा बजावल्या जात आहेत. आता येणा-या उन्हाळ्यात नागरिक घरात पाण्याचा साठा करून ठेवतील परंतु, पाण्याचा साठा बंदिस्त ठेवण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागाने केले आहे.स्वाइन फ्ल्यूचा जोर कमीथंडीमुळे स्वाइन फ्ल्यूचा धोका वाढला होता. परंतु, शहरात स्वाइन फ्ल्यूचाही जोर कमी झालेला असून महापालिकेने त्यासंदर्भातही आपल्या स्तरावर उपाययोजना सुरू ठेवल्याची माहिती आरोग्य व वैद्यकीय विभागामार्फत देण्यात आली. अजून किमान महिनाभर त्याबाबत काळजी घ्यावी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकdengueडेंग्यू