शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

धनेर गाव विकासापासून वंचित

By admin | Updated: February 21, 2016 22:44 IST

स्वतंत्र ग्रामपंचायत करण्याची ग्रामस्थांची मागणी

कळवण : दरेभणगी व धनेर ग्रुप ग्रामपंचायतीचे विकेंद्रीकरण करून धनेर येथे स्वतंत्र ग्रामपंचायत कार्यान्वित करावी, अशी मागणी शेकडो धनेर आदिवासी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी दीपेंद्र कुशवाह यांच्याकडे केली आहे. दरेभणगी, धनेर ग्रुप ग्रामपंचायत स्थापन होऊन २८ वर्षे झाली परंतु गेल्या काही वर्षांपासून धनेर गावात कुठल्याही प्रकारची विकासकामे झाली नाहीत. त्यामुळे धनेर गाव विकासापासून वंचित असून, या गावाला विकासकामांना चालना मिळत नसल्यामुळे लोकसंख्या असलेल्या १०० टक्के आदिवासी असलेल्या धनेर गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात आणावी, अशी मागणी धनेर ग्रामस्थांनी केली आहेकळवणपासून १० ते १२ किमी अंतरावर असलेले धनेर गाव विकासापासून वंचित असून, पाणी, रस्ते, वीज, आरोग्य या मूलभूत सुविधांसह सर्वांगीण विकासासाठी धनेर गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात आणण्यासाठी शासनस्तरावरून कार्यवाही व्हावी, अशी मागणी धनेरचे हिराचंद गावित यांनी केली आहे. धनेर ग्रामस्थांनी कळवण पंचायत समितीमध्ये ग्रामपंचायत अस्तित्वात आणावी या मागणीचे यापूर्वी निवेदन देऊन मागणी केली आहे; मात्र कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. शिवाय धनेर गावात झालेल्या कामांची पाहणी करण्यासाठी कुणीही अधिकारी व कर्मचारी न आल्याने धनेर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. धनेर येथे स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार, नितीन पवार, कळवण पंचायत समितीच्या सभापती संगीता ठाकरे, उपसभापती अ‍ॅड. संजय पवार यांनी लक्ष केंद्रित करावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)