शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
4
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
5
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
6
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
7
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
8
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
9
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
10
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
11
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
12
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
13
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
14
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
15
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
16
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
17
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
18
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
19
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
20
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
Daily Top 2Weekly Top 5

एकजूट दाखवत रॅलीद्वारे महाविकास आघाडीचे शक्तीप्रदर्शन

By suyog.joshi | Updated: April 29, 2024 17:36 IST

महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी सोमवारी शहरातून रॅलीद्वारे एकजूट दाखवत शक्तीप्रदर्शन केले.

नाशिक: महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी सोमवारी शहरातून रॅलीद्वारे एकजूट दाखवत शक्तीप्रदर्शन केले. नाशिकच्या जागेसाठी राजाभाऊ वाजे यांनी तर दिंडोरीच्या जागेसाठी भास्कर भगरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. शालिमार येथील शिवसेना भवनपासून रॅलीला प्रारंभ झाला. रॅलीसाठी सिन्नर, दिंडोरी, येवला, इगतपुरी, नांदगाव, कळवण, सुरगाणा, पेठ, देवळ्यासह जिल्ह्याच्या विविध भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  ही रॅली शालिमारमार्गे मेनरोड, गाडगे बाबा महाराज चौक, रविवार कारंजा, रेहक्रॉस, महात्मा गांधी रोड, मेहर सिग्नलपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली. फलकांनी वेधले लक्षपक्ष कार्यालयापासून निघालेल्या रॅलीमध्ये ढोल ताशांचा गजर करण्यात आला. अन्यायाविरूद्ध लढणार, प्रस्थापितांना भिडणार अन आम्ही जनसेवा करणार, नाशिकच्या शाश्वत विकासाचा चेहरा, जनतेचं प्रेम-माया-विश्वास हीच खरी सावली, मायबाप जनता हीच माऊली यासह वेगवेगळे फलक पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या हातात होते. ते रॅलीच्या अग्रभागी होते, त्यामुळे ते लक्ष वेधून घेत होते. महिला कार्यकत्यांचे फोटोसेशनरॅलीत सहभागी झालेल्या महिलांची संख्या लक्षणीय होती. जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या महिलांनी रॅलीच्या अगोदर फोटोसेशन केले. उद्धवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी भगवी साडी परिधान केली होती. तर पुरूष अन महिलांनी डोक्यावर भगव्याच रंगाच्या टोप्या परिधान केल्या होत्या. तप्त उन्हात पायी वारी...सकाळी नऊ वाजेची वेळ दिली असतांना रॅली १२ वाजून ९ मिनिटांनी सुरू झाली. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना बरीच वाट पहावी लागली. नाशिकचा पारा ४० अंशांच्यावर गेला असतांना भर उन्हात पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी पायी वारी करीत असतांना रॅलीच्या शेवटच्या टप्पयापर्यंत पाेहोचले. शालिमार कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत येण्यास सुमारे दाेन तासांचा कालावधी लागला. नेते म्हणाले...१) संजय राऊत (उद्धव सेनेचे नेते तथा खासदार)-महाराष्ट्रातील सर्वात मोठी रॅली बघून आज आनंद होतो आहे. हे आपल्या विजयाचेच चिन्ह आहे. उत्तर महाराष्ट्रातून महायुतीच विजयी होईल. आपल्याला हुकुमशाही नष्ट करायची आहे, हे लक्षात ठेवा.२) जयंत पाटील (प्रदेशाध्यक्ष, शरदचंद्र पवार गट, राष्ट्रवादी)-आजपासून लढाई सुरू झाली आहे. भगरे, वाजे यांनी लढाई सुरू होण्यापूर्वीच जिंकली आहे. शेतकऱ्यांच्याप्रश्नी केंद्र व राज्य शासनाने दुर्लक्ष केले आहे. कांदाप्रश्नी शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पूसली आहेत.३) बाळासाहेब थोरात (काँग्रेस विधिमंडळ नेते)-येथे जमलेल्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा उत्साह चांगला आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्व जागा महाविकास आघाडीलाच राहतील याचा विश्वास आहे.

टॅग्स :NashikनाशिकMahavikas Aghadiमहाविकास आघाडी