शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा शिंदे, अजितदादांसोबत या; PM मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांना खुली 'ऑफर'
2
"यूपीत इंडिया आघाडीचे वादळ, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत", राहुल गांधींचा हल्लाबोल
3
'ज्या व्यक्तीचा...'; नरेंद्र मोदींच्या ऑफरवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
सलमान-अक्षयचे सिनेमे फ्लॉप का होताएत? श्रेयस तळपदेने दिलं उत्तर; म्हणाला, 'लोक थकले...'
5
“अरे बापरे! शरद पवारांचे अंतःकरण किती उदार आहे”; देवेंद्र फडणवीसांचा मिश्किल टोला
6
Kanhaiya Kumar : कन्हैया कुमार यांच्याकडे संपत्ती किती? शिक्षण किती घेतलंय? जाणून घ्या...
7
Narendra Dabholkar Case: मोठी बातमी! अखेर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला; अंदुरे, कळसकरला जन्मठेप
8
प्रज्वल रेवण्णा प्रकरणात नवा ट्विस्ट! एसआयटी महिलांना वेश्याव्यवसाय प्रकरणात अडकवण्याची धमकी देते? जेडीएसने दावा केला
9
‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यांना सन्मान द्या, तसं न झाल्यास...’ मणिशंकर अय्यर यांचं विधान 
10
‘...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही राहणार नाही’, भाजपाचं मणिशंकर अय्यर यांना प्रत्युत्तर   
11
“PM मोदींमुळे हिरे व्यापाराला चालना, जागतिक बाजारपेठेत भारताचे भवितव्य आशादायी”: पीयूष गोयल
12
'ठाकरेंना अडचणीत आणणारं शपथपत्र द्या'; देशमुखांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, 'त्यांचा निरोप...'
13
डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला: "हत्येच्या गुन्ह्याचे समर्थन चुकीचे, तपास अधिकाऱ्यांचा निष्काळपणा" न्यायालयाचे निरीक्षण
14
SSY Vs SIP: सुकन्या समृद्धी की एसआयपी, कोणती स्कीम तुमच्या मुलीसाठी जमवेल अधिक पैसा? जाणून घ्या
15
Fact Check: लोकसभा निवडणुकीत परदेशातून आलेल्या मुस्लिमांना आर्थिक मदत जाहीर करणारे पत्र बनावट
16
विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर 
17
दलजीत कौरच्या भांगेत सिंदूर? दुसऱ्या पतीसोबतही घटस्फोट झाल्याची होती चर्चा
18
Parshuram Jayanti 2024: परशुरामांना कोकणचा देव का मानतात? आदिलशहाने त्यांचे मंदिर का बांधले? वाचा!
19
Parshuram Jayanti 2024: भगवान परशुराम यांच्या दिव्य कार्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? सविस्तर वाचा!
20
Akshaya Tritiya च्या मुहूर्तावर Gold महागलं, चांदीही ८५००० रुपयांपार; जाणून घ्या आजचा भाव

‘मेमरी क्लब’ देतोय ज्येष्ठांच्या स्मरणशक्तीला चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:23 AM

ज्येष्ठ अर्थात वयाच्या साठ वर्षांवरील व्यक्तींमध्ये विस्मृती हा आजार आढळत असून, साधारणत: पंच्याहत्तरीनंतर सुमारे २५ टक्के व्यक्तींना हा त्रास होतो़ ज्येष्ठांंना हा आजार होऊ नये तसेच शरीराच्या आरोग्याबरोबरच मेंदूचे आरोग्यही चांगले रहावे यासाठी नाशिकमध्ये गत तीन वर्षांपासून ज्येष्ठांसाठी ‘मेमरी क्लब’ सुरू आहे़

नाशिक : ज्येष्ठ अर्थात वयाच्या साठ वर्षांवरील व्यक्तींमध्ये विस्मृती हा आजार आढळत असून, साधारणत: पंच्याहत्तरीनंतर सुमारे २५ टक्के व्यक्तींना हा त्रास होतो़ ज्येष्ठांंना हा आजार होऊ नये तसेच शरीराच्या आरोग्याबरोबरच मेंदूचे आरोग्यही चांगले रहावे यासाठी नाशिकमध्ये गत तीन वर्षांपासून ज्येष्ठांसाठी ‘मेमरी क्लब’ सुरू आहे़ ज्येष्ठांच्या बुद्धीला चालना देणाऱ्या या क्लबमध्ये शब्दकोडी, गणितीकोडी, सजावट, चित्रकला, उलटे आकडे, उलट्या हाताने काम करणे़, अक्षरावरून शब्द तयार करणे याबरोबरच वैद्यकीय तज्ज्ञांची व्याख्यानेही आयोजित केली जात आहेत़  पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील मेमरी क्लिनिकमधील डॉ़ मंगलाताई जोगळेकर यांनी चार वर्षांपूर्वी मेमरी क्लब सुरू केला़ तर नाशिकमध्ये तीन वर्षांपूर्वी सारडा कन्या विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षिका अनघा ताटके यांनी जोगळेकर यांच्याकडून माहिती घेत पारिजातनगरला या क्लबची सुरुवात केली़ या मेमरी क्लबने गत तीन वर्षांमध्ये तज्ज्ञ डॉ़ महेश करंदीकर, डॉ़ हितेश चौधरी, मानसोपचारतज्ज्ञ अभिजित कारेगावकर यांची व्याख्याने तसेच कार्यशाळेचे आयोजन केले होते़ तसेच मेमरी क्लबतर्फे घेण्यात आलेल्या कार्यशाळेत औरंगाबादच्या आस्था फाउंडेशनच्या सुमारे पंधरा तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले होते़साधारणत: वयाच्या साठीनंतर ज्येष्ठांना थोडे-थोडे विसरायला होते, अन् हे विसरणे हळूहळू वाढून त्यांचा परिणाम विस्मृती (डिमेन्शिया) होतो़ नाशिकरोड व पारिजातनगर येथे सुरू असलेल्या या मेमरी क्लबमध्ये सुमारे शंभर सदस्य असून दर महिन्याच्या पहिल्या व तिसºया बुधवारी वृद्धांसाठी शब्दकोडी, गणितीकोडी, चित्रकला, बुद्धीवर्धक अशी योगासने शिकविली जात आहेत़ येत्या काही वर्षांमध्ये डिमेन्शियाच्या रुग्णांमध्ये वाढ होत जाणार असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत असून यावर मेमरी क्लब हा चांगला उपाय ठरणार आहे़

टॅग्स :Nashikनाशिक