शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महापालिकेचे १७८५ कोटींचे अंदाजपत्रक सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 15:29 IST

स्थायी समिती : ‘अडथळामुक्त शहर’ करण्याचा आयुक्तांचा संकल्प

ठळक मुद्दे शहराच्या गरजा आणि प्राथमिकता लक्षात घेऊन पायाभूत सोयी-सुविधांवर भरशहरात चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचाही मानस

नाशिक - महापालिकेचे सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे १४५३.३९ कोटी रुपयांचे सुधारित तर सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी १.९१ कोटी रुपये शिलकीसह १७८५.१४ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी (दि.२२) स्थायी समितीला सादर केले. शहराच्या गरजा आणि प्राथमिकता लक्षात घेऊन पायाभूत सोयी-सुविधांवर भर देतानाच वापराप्रमाणे सेवाशुल्क आकारणीचे सुसूत्रीकरण करत आयुक्तांनी पुढील दोन वर्षांत नाशिक शहर हे ‘बॅरिअर फ्री सिटी’ अर्थात ‘अडथळामुक्त शहर’ करण्याचा संकल्प सोडला आहे. याशिवाय, शहरात चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचाही मानस अंदाजपत्रकात व्यक्त करण्यात आला आहे.दीड महिन्यांपूर्वी महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी माजी आयुक्तांनी तयार केलेल्या अंदाजपत्रकाऐवजी नव्याने अंदाजपत्रक तयार करण्याचा निर्णय घेतला आणि वाद-प्रवादानंतर गुरुवारी त्यांनी स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी अहेर-आडके यांच्याकडे अंदाजपत्रक सुपुर्द केले. आयुक्तांनी अंदाजपत्रकात मागील वर्षाच्या तुलनेत अंदाजपत्रकात ३३१.७५ कोटी रुपयांची वाढ अपेक्षित धरली आहे. अंदाजपत्रकात उत्पन्नवाढीसाठी काही स्त्रोतांकडे जाणीवपूर्वक लक्ष पुरविले जाणार असून घरपट्टीच्या माध्यमातून २५३ कोटी रुपयांचे उत्पन्न प्रस्तावित करताना त्यात गतवर्षाच्या तुलनेत १३९.९७ कोटी रुपये इतकी वाढ अपेक्षित धरली आहे. त्यामुळे थकबाकीदारांविरुद्ध वसुली मोहीम कठोर होण्याचे संकेत दिले आहेत. पाणीपट्टीही जो जास्त पाणी वापरेल त्यालाच पाणी वापरानुसार जास्त दर हे टेलिस्कोपिक दराने आकारले जाणार असून तसा प्रस्ताव लवकरच महासभेत सादर केला जाणार आहे. शहरात आॅनस्ट्रीट व आॅफस्ट्रीट पार्कींगचेही नियोजन प्रस्तावित आहे. याशिवाय, शहरात व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाला परवाना शुल्क आकारण्याचेही प्रस्तावित करण्यात आले आहे. पाणीपुरवठा व्यवस्थेत स्काडा यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. दरम्यान, शिक्षण विभागासाठी ६४.४४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून ५.८९ कोटी रुपयांचे वृक्षनिधी अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे.स्थायीकडून दुरुस्तीसह मंजुरीआयुक्तांनी सादर केलेले अंदाजपत्रक हे वास्तववादी असल्याचे सांगत सत्ताधारी भाजपाने त्याचे स्वागत केले आणि त्यात फारसा बदल न करता दुरुस्तीसह अंदाजपत्रकाला मंजुरी दिली. सदर अंदाजपत्रकाला ३१ मार्चच्या आत महासभेची मंजुरी आवश्यक असल्याने तातडीने ठराव महासभेवर पाठविण्याचे निर्देश सभापती हिमगौरी अहेर-आडके यांनी यावेळी दिले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे