शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

घटनाबाह्य धोरणांमुळे लोकशाही भयाखाली : उत्तम कांबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:32 IST

हा देश नेमका कोण चालवतो? हे समजण्यापलीकडे आहे. कारण सातत्याने या सरकारकडून घटनेविरुद्ध धोरणे आखून धार्मिक भावना ज्वलंत ठेवत धर्मनिरपेक्षता, सहिष्णुता लोकशाहीच्या नीतीमूल्यांचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे लोकशाही भयाखाली सापडली आहे, असे प्रतिपादन मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी केले.

नाशिक : हा देश नेमका कोण चालवतो? हे समजण्यापलीकडे आहे. कारण सातत्याने या सरकारकडून घटनेविरुद्ध धोरणे आखून धार्मिक भावना ज्वलंत ठेवत धर्मनिरपेक्षता, सहिष्णुता लोकशाहीच्या नीतीमूल्यांचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे लोकशाही भयाखाली सापडली आहे, असे प्रतिपादन मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी केले. गीताई फाउंडेशनच्या वतीने आयोजित शहीद गौरी लंकेश एल्गार पुरस्कार पत्रकार दीप्ती राऊत यांना बुधवारी (दि.२०) कांबळे व ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मानपत्र, सन्मानचिन्ह व पाच हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते. याप्रसंगी कांबळे म्हणाले, आपल्या देशात भावना तीव्र अन् स्वस्त: केल्या जात असल्यामुळे माणसाचे जगणे मुश्कील होऊ लागले आहे. ज्या देशात ‘पवित्र’ गोष्टी अधिक वाढतात तो देश नेहमी मागासलेला राहतो, हे लक्षात घेता देशाच्या अशा बिकट आणि धर्मनिरपेक्षतेविरुद्ध तयार झालेल्या वातावरणात पत्रकारितेची जबाबदारी अधिक वाढल्याचे ते म्हणाले.  डॉ. नरेंद्र दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी व गौरी लंकेश यांच्या हत्या करून विचार मारण्याचे प्रयत्न एकीकडे होत असताना या विचारांंना जिवंत ठेवत बळ देण्याचे काम गौरी लंकेश एल्गार पुरस्काराच्या माध्यमातून गीताई फाउंडेशनद्वारे केले जात असल्याचे गौरवोद्गार किरण अग्रवाल यांनी यावेळी काढले.  सार्वजनिक क्षेत्रात महिलांचा टक्का वाढावा, यासाठी समाजाने पूरक व्यवस्था उभी करण्याची अपेक्षा पुरस्कारार्थी दीप्ती राऊत यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक फाउंडेशनचे अध्यक्ष मनोहर आहिरे यांनी केले. सूत्रसंचालन अनिता पगारे तर आभार कल्याणी आहिरे यांनी मानले. पत्रकारिता कसोटीच्या वळणावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेद्वारे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले असले तरी त्याची गळचेपी होत असल्याने पत्रकारिता कसोटीच्या वळणावर आली आहे. महिलांनी या क्षेत्रात काम करणे अधिक जोखमीचे ठरू पाहत आहे. अशी जोखीम पत्करणार्‍या गौरी लंकेशची स्मृती जपून तिच्याच पावलावर पाऊल टाकून पत्रकारिता करणाºया दीप्ती राऊत यांना सन्मानित करण्याचे काम कौतुकास्पद असल्याचे किरण अग्रवाल यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक