शेतकरी, शेतमजूर वर्गाला लसीकरण करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:43 PM2021-05-13T16:43:13+5:302021-05-14T00:54:37+5:30

येवला : ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता शासनाने शेतकरी, शेतमजूर वर्गाला प्रथम प्राधान्याने लसीकरण करण्याची मागणी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रांतिक सदस्य एकनाथ गायकवाड यांनी केली आहे.

Demand for vaccination of farmers, agricultural laborers | शेतकरी, शेतमजूर वर्गाला लसीकरण करण्याची मागणी

शेतकरी, शेतमजूर वर्गाला लसीकरण करण्याची मागणी

Next
ठळक मुद्देशासनाने शेतकरी शेतमजुरांना प्राधान्याने कोरोना प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक

येवला : ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता शासनाने शेतकरी, शेतमजूर वर्गाला प्रथम प्राधान्याने लसीकरण करण्याची मागणी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रांतिक सदस्य एकनाथ गायकवाड यांनी केली आहे.

याप्रकरणी पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देण्यात आले आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात उन्हाळ कांदा काढणी व कांदा साठवणूक सुरू असून या कामा साठी कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात मजर टंचाई निर्माण झाली आहे. मजूर मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. खरीप हंगाम सुरू होत असल्याने शेती मशागतीची कामे सुरू आहेत. शेती व्यवसाय सुरू व टिकून राहण्यासाठी शासनाने शेतकरी शेतमजुरांना प्राधान्याने कोरोना प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक असल्याचे सदर निवेदनात गायकवाड यांनी म्हटले आहे.
निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादासाहेब भुसे, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नानासाहेब पटोले यांना पाठवण्यात आल्या आहेत.

Web Title: Demand for vaccination of farmers, agricultural laborers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.