शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

भाकपकडून आघाडीकडे दोन जागांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 01:12 IST

नाशिक : भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून नाशिक जिल्ह्यातील चांदवड-देवळा आणि नांदगाव या दोन जागांसह राज्यात एकूण १५ जागांची मागणी केली आहे. त्याबाबत बुधवारी कॉँग्रेस, राष्टÑवादी आणि आघाडीतील अन्य पक्षांसमवेत होणाऱ्या बैठकीत निर्णय होणार असल्याचे भाकपचे केंद्रीय सचिव मंडळाचे सदस्य डॉ. भालचंद्र कांगो यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देसमविचारी पक्षांशी आघाडी करूनच लढण्याचा पक्षाचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून नाशिक जिल्ह्यातील चांदवड-देवळा आणि नांदगाव या दोन जागांसह राज्यात एकूण १५ जागांची मागणी केली आहे. त्याबाबत बुधवारी कॉँग्रेस, राष्टÑवादी आणि आघाडीतील अन्य पक्षांसमवेत होणाऱ्या बैठकीत निर्णय होणार असल्याचे भाकपचे केंद्रीय सचिव मंडळाचे सदस्य डॉ. भालचंद्र कांगो यांनी पत्रकार परिषदेत दिली.आयटक कामगार केंद्रात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. कांगो यांनी समविचारी पक्षांशी आघाडी करूनच लढण्याचा पक्षाचा प्रयत्न राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. बुधवारी होणाºया राज्यस्तरीय बैठकीत त्याबाबत वाटाघाटी करून अंतिम निर्णय होणार आहे. त्यात पक्षाला किती जागा मिळतात, सन्माननीय तडजोड होते का? त्याबाबतचा निर्णयदेखील पक्षाचे राज्यनेतृत्व घेणार आहे. त्यातदेखील भाजप-शिवसेनेच्या युतीच्या उमेदवारांचा कोणताही फायदा होऊ नये, असेच आमचे प्रयत्न राहणार असल्याचे डॉ. कांगो यांनी नमूद केले.महाराष्टÑाच्या राजकारणाची वाटचालदेखील केरळ, तामिळनाडूप्रमाणे दोन आघाड्यांतील संघर्षाकडे होत असल्याचे दिसत आहे. जनता केंद्र आणि राज्यातील भाजपच्या कारभाराने त्रस्त झाली असून, मंदीमुळे कामगार आणि चुकीच्या धोरणांमुळे कृषिक्षेत्र संकटात सापडले आहे. त्यामुळे हे दोन्ही वर्ग आता भाजप आणि युतीच्या विरोधात मतदान करणार असल्याचा दावादेखील कांगो यांनी केला.दरम्यान, भाकपने जिल्ह्यातील चांदवड-देवळा आणि नांदगाव या दोन विधानसभा मतदारसंघावर दावा केल्याने या मतदारसंघातील इच्छुकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यादृष्टीने त्यांनी तयारी आरंभली आहे. नांदगावमध्ये एकदा यश भाकपने आजवर जिल्ह्यात अनेकदा विधानसभा निवडणूक लढविलेली आहे. यापूर्वी भाकपला नांदगाव मतदारसंघातून यश मिळालेले आहे. या मतदारसंघातून माधवराव गायकवाड यांनी विजय संपादन केलेला होता. जिल्ह्यात माकपचे अस्तित्व दिसून येत असताना भाकपची ताकद घटलेली दिसून येते. आमचे ज्या ठिकाणी भक्कम उमेदवार आहेत, त्याच जागा आम्ही लढवणार आहोत. कॉँग्रेस आघाडीत स्थान मिळाले तर अशा जागी आम्ही वंचित बहुजन आघाडीकडूनही पाठिंबा घेणार आहोत. मात्र, कॉँग्रेस आघाडीत स्थान मिळाले नाही तर आमच्या जागांवर वंचितकडून पाठिंबा तर ज्या जागी वंचितचे दमदार उमेदवार असतील, अशा ठिकाणी वंचितच्या उमेदवारांना खुला पाठिंबा देण्यात येणार असल्याचेही डॉ. कांगो यांनी नमूद केले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NCPराष्ट्रवादी काँग्रेस