लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : वीस हजार रुपयांची खंडणी न दिल्यास जिवे मारण्याची धकमी देऊन मारहाण केल्याची घटना रविवारी (दि़२१) दुपारच्या सुमारास भद्रकालीतील बागवानपुऱ्यात घडली़ जुनेद शेख अल्लाउद्दीन (२७ रा.हरिनगर सोसा.बागवानपुरा) यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास संशयित अफताब ऊर्फ रिम्मी हा हरिनगरी सोसायटीत आला व २० हजार रुपयांची मागणी केली़ शेख यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने रिम्मीने शेख यांच्या मुलास उचलून नेण्याचे तसेच जिवे मारण्याची धमकी देऊन चॉपरचा धाक दाखवला़ यानंतर जुनेद शेख यांना बेदम मारहाण करून त्यांचे कपडे फाडले़याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात रिम्मीविरोधात खंडणी तसेच मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वीस हजार रुपयांच्या खंंडणीची मागणी
By admin | Updated: May 22, 2017 17:02 IST