शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 00:59 IST

जेलरोड नारायणबापूनगर येथे वाहनांच्या काचा फोडून दहशत माजविणाऱ्या व जेलरोड भागात भाईगिरी, टवाळखोरी करणाºया गुंडांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना निवेदन देताना नगरसेवक प्रशांत दिवे, राहुल दिवे, दिनकर आढाव, मंगला आढाव, रोशन आढाव, गणेश जाधव, देवीदास पगार, मिलिंद शिरसाठ, अक्षय आहिरे.नाशिकरोड : जेलरोड नारायणबापूनगर येथे वाहनांच्या काचा फोडून दहशत माजविणाऱ्या व जेलरोड भागात भाईगिरी, टवाळखोरी करणाºया गुंडांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. जेलरोड नारायणबापूनगर येथे शनिवारी मध्यरात्री टवाळखोर मद्यपी युवकांनी दगडफेक करून तीन चारचाकी गाड्यांच्या काचा फोडून नुकसान केले. तसेच दुचाकीचीदेखील मोडतोड करून नारायणबापूनगर चौकातील पोलीस चौकीवर दगडफेक केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. जेलरोड भागात युवती, महिलांची छेडछाड, सार्वजनिक ठिकाणी, मनपा शाळा, उद्यान या ठिकाणी सायंकाळनंतर मद्यपींच्या गोंधळामुळे रहिवासी व विशेष करून महिलावर्ग त्रस्त झाला आहे. याबाबत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची नगरसेवक प्रशांत दिवे, मंगला आढाव, दिनकर आढाव, राहुल दिवे यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांनी भेट घेऊन वाढती टवाळखोरी, गुंडगिरी याबाबत चर्चा करून निवेदन दिले. जेलरोड भागात व्यापारी व रस्त्यावरील विक्रेते यांना धमकाविणे, हप्ते गोळा करणे, युवती, महिलांची छेडछाड, पेट्रोल चोरी, वाहनांचे नुकसान, रस्त्यावरील व उद्यानातील पथदीव्यांचे दिवे फोडणे या गोष्टी नित्याच्याच झाल्याने रहिवासी दहशतीच्या वातावरणात जगत आहे. रात्रीच्या वेळी टवाळखोर दारू पिऊन उपद्रव करीत आहे. पोलिसांनी जेलरोड भागात दिवस-रात्र गस्त वाढवून टवाळखोरी व भाईगिरी करणाऱ्यांची दहशत मोडून काढावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर नगरसेवक प्रशांत दिवे, मंगला आढाव, दिनकर आढाव, राहुल दिवे, रोशन आढाव, गणेश गडाख, किरण जाधव, अ‍ॅड. प्रसाद नागवंशी, वृषाली भोळे, कमल सरमाडे, अनिता गिरी, सुनीता पाटील, देवीदास पगार, गणेश जाधव, मिलिंद शिरसाठ, अक्षय आहिरे आदींच्या सह्या आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयNashikनाशिक