सिन्नर : महाविद्यालय सुटल्यानंतर पिंपळे येथील विद्यार्थ्यांना घरी जाण्याची व्यवस्था नसल्याने सिन्नर-पिंपळे बस सुरू करण्याची मागणी जनविकास फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.पिंपळे येथून सिन्नर महाविद्यालयात अनेक विद्यार्थी येत असतात. महाविद्यालय सुटल्यानंतर या विद्यार्थ्यांना पिंपळे येथे जाण्यासाठी दुपारी ४ वाजेच्या सुमारास बस नसल्याने त्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. सिन्नर येथून डुबेरे, डुबेरवाडी, हिवरेफाटा व पिंपळे या मार्गे बस सुरू करण्याची मागणी जनविकास फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश लोंढे, भाऊसाहेब पानसरे, राजाराम बिन्नर यांच्यासह विद्यार्थ्यांनी केली आहे. (वार्ताहर)
सिन्नर-पिंपळे बस सुरू करण्याची मागणी
By admin | Updated: July 20, 2014 01:43 IST