विद्युत सब स्टेशनचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 06:19 PM2021-01-23T18:19:14+5:302021-01-23T18:21:36+5:30

ब्राह्मणगाव : येथील सबस्टेशनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी कृषीमंत्री दादा भुसे यांची गावातील मान्यवरांसमवेत भेट घेऊन लेखी निवेदन दिले. भुसे यांनी हा प्रश्न तत्काळ मार्गी लावू असे अभिवचन दिले.

Demand for solution of power sub station issue | विद्युत सब स्टेशनचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी

मालेगाव येथे दादासाहेब भुसे यांना विविध मागण्यांचे लेखी निवेदन देताना ब्राह्मणगाव ग्रामपंचायतीचे नवोदित सदस्य, तसेच पप्पू बच्छाव व शेतकरी.

Next
ठळक मुद्देब्राह्मणगाव : कृषीमंत्र्यांचे आश्वासन

ब्राह्मणगाव : येथील सबस्टेशनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी कृषीमंत्री दादा भुसे यांची गावातील मान्यवरांसमवेत भेट घेऊन लेखी निवेदन दिले. भुसे यांनी हा प्रश्न तत्काळ मार्गी लावू असे अभिवचन दिले.
या प्रमुख प्रश्नाबरोबरच गावातील शेत शिवारात सिंगल फेज वीज पुरवठा, शेत शिवारात रस्ते, ब्राह्मण गाव - महाल पाटणे गावाला जोडणारा गिरणा नदीवर पुलाचे निर्माण करणे, बुध्द विहार सभामंडप पॅगोडा मंदिर निर्माण आदी कामांबद्दल यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य पप्पू बच्छाव, माजी सरपंच व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुभाष आहिरे, नवनिर्वाचित सदस्य व मार्केट कमेटीचे माजी सदस्य किरण आहिरे, शिवसेनेचे संदीप आहिरे, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य आर. पी. आय. तालुका अध्यक्ष बापुराज खरे, नवनिर्वाचित सदस्य विनोद आहिरे, नितीन आहिरे, प्रहार संघटनेचे रोशन आहिरे, नवनिर्वाचित सदस्य बापू माळी, दा ढेपले, जनार्धन सोनवणे, शामराव माळी, कैलास आहिरे, पुंजाराम आहिरे, गौरव शिरोडे, रमेश आहिरे, भाऊसाहेब आहिरे, केवळ आहिरे, भगवान आहिरे, समाधान डांगळ आदी मालेगाव येथे उपस्थित होते.
या प्रसंगी भुसे यांना ब्राम्हणगावतील प्रलंबित सबस्टेशनचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गावातील शिष्टमंडळाचे भेटी प्रसंगी वीज वितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सानप यांना फोन करून माहिती घेतली व तत्काळ प्रलंबित ब्राम्हणगाव सबस्टेशन चा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सांगितले. सानप यांनी येणाऱ्या काळात पहिल काम ब्राम्हणगाव येथील सबस्टेशनच हाती घेऊ असे आश्वासन दिले.
याच बरोबर शेतशिवार सिंगल फेज योजना, शेत शिवार रस्ते, महालपाटणे गिरणा नदीवर पुलाच काम इत्यादी कामे मार्गी लावण्यासाठी कृषी मत्र्यांना साकडे घातले व या प्रलंबित प्रश्न बाबत लवकरच कार्यवाहीचे आश्वासन दिले.
 

Web Title: Demand for solution of power sub station issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.