शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरीकांसाठी राष्ट्रीयकृत बँकेत स्वतंत्र काऊंटरची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 00:13 IST

देवळा : येथील बँक ऑफ बडोदा शाखेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यामुळे ज्येष्ठ नागरीक व पेन्शनधारकांची कुचंबना होत असल्यामुळे पैसे देण्याघेण्याचे व्यवहार करण्यासाठी ज्येष्ठांकरता स्वतंत्र काउंटर सुरू करून गैरसोय दूर करावी, तसेच वेळेवर पेन्शन मिळावी अशी मागणी तालुका पेन्शनर्स संघटनेने केली आहे.

ठळक मुद्देसेवानिवृत्त पेन्शनधारकांची संख्या मोठी आहे.

देवळा : येथील बँक ऑफ बडोदा शाखेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यामुळे ज्येष्ठ नागरीक व पेन्शनधारकांची कुचंबना होत असल्यामुळे पैसे देण्याघेण्याचे व्यवहार करण्यासाठी ज्येष्ठांकरता स्वतंत्र काउंटर सुरू करून गैरसोय दूर करावी, तसेच वेळेवर पेन्शन मिळावी अशी मागणी तालुका पेन्शनर्स संघटनेने केली आहे.देवळा तालुक्याची निर्मिती झाल्यानंतर शहरात स्टेट बँक व महाराष्ट्र बँकेची शाखा सुरू करण्यात आली. यामुळे शहरात बडोदा बँकेच्या ( तत्कालीन देना बँक ) शाखेवरील कामाचा भार कमी होऊन ग्राहकांना चांगली सुविधा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. परंतु ह्या तिन्ही शाखांपैकी बडोदा बँकेतील कर्मचाऱ्यांविषयी ज्येष्ठ नागरीकांच्या तक्रारी आहेत. ह्या बँकेत ग्राहक असलेल्या सेवानिवृत्त पेन्शनधारकांची संख्या मोठी आहे.ऑनलाईन व्यवहार सुरू झाल्यापासून शहरातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकाच्या शाखांमध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. यामुळे ग्राहकांना सुविधा देतांना बँक कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. बँकेतील अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे बँकेत आलेल्या ग्राहकांना तिष्ठत थांबावे लागून वेळ वाया जातो. ज्येष्ठ नागरीक व महीलांचे जास्त हाल होतात. कॅशियरच्या काउंटरवर पैसे देण्याघेण्याचे सर्व व्यवहार होत असल्यामुळे हया ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. ज्येष्ठ नागरीकांसाठी स्वतंत्र कॅश काउंटर वाढवले तर गर्दी कमी होउन ग्राहकांना चांगली सेवा मिळेल व रांगेत तिष्ठत उभे रहावे लागणार नाही. बँक व्यवस्थापनाने रिक्त अधिकाऱ्याची जागा भरावी, व ज्येष्ठ नागरीकांसाठी एक कॅश काउंटर वाढवावे अशी मागणी प्रा.आर.के. पवार, कृष्णा बच्छाव, निंबाजी आहेर, आर.के.आहिरराव आदी पेन्शन धारकांनी केली आहे.कोट...जून महिन्याची पेन्शन अद्याप मिळाली नाही. प्रत्येक महीन्यात पाच तारखेच्या आत पेन्शन द्यावी असे शासनाचे आदेश आहेत. परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे. पेन्शन कधी येईल याची निश्चित माहीती नसल्यामुळे चौकशी करण्यासाठी वारंवार बँकेत फेऱ्या माराव्या लागतात. बहुतेक पेन्शनर व्यक्तींना उतारवयात मधुमेह, ह्रदयविकार, सांधेदुखी,आदी सारख्या विविध शारीरीक व्याधी जडलेल्या आहेत. बडोदा बँकेची शाखा पहिल्या मजल्यावर असल्यामुळे पेन्शनधारकांची जीन्याने चढउतार करून दमछाक होते.- कृष्णा बच्छाव,सेवानिवृत्त शिक्षक, देवळा.पेन्शन मिळण्यास होणाऱ्या दिरंगाईमुळे ह्या ज्येष्ठ व्यक्तींना पैशांअभावी आषधोपचार थांबविण्याची पाळी आली असून आरोग्याच्या नवीन समस्या उद‌्भवू लागल्या आहेत. त्यांची कुटुंबात मानसिक कुचंबना होत आहे. स्वतंत्रपणे राहणाऱ्या पेन्शनर व्यक्तींची अवस्था तर अतिशय बिकट झाली आहे. दरमहा पाच तारखेच्या आत पेन्शन मिळावी.- निंबाजी आहेर, सदस्य, तालुका पेन्शनर्स संघटना. (०७ देवळा)

टॅग्स :bankबँकSocialसामाजिक