शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कामगारांच्या भरतीसाठी पंधरा हजार रुपयांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 00:15 IST

नाशिक : शहरात सुमारे सातशे सफाई कामगार आउटसोर्सिंगने भरण्यासाठी ठेकेदार वॉटर ग्रेस कंपनीकडून सध्या कामगारांची भरती सुरू आहे. तथापि, त्यासाठी ठेकेदार कंपनीने उमेदवारांकडून पंधरा हजार रुपये वसूल केले जात असल्याच्या आरोपामुळे पुन्हा वाद निर्माण झाला आहेत.

नाशिक : शहरात सुमारे सातशे सफाई कामगार आउटसोर्सिंगने भरण्यासाठी ठेकेदार वॉटर ग्रेस कंपनीकडून सध्या कामगारांची भरती सुरू आहे. तथापि, त्यासाठी ठेकेदार कंपनीने उमेदवारांकडून पंधरा हजार रुपये वसूल केले जात असल्याच्या आरोपामुळे पुन्हा वाद निर्माण झाला आहेत. अशाप्रकारे नियमबाह्य पद्धतीने वसुली सुरू असून, ठेकेदाराची चौकशी करावी, अशी मागणी नगरसेवक आणि अन्य पक्षांनी केली आहे.संबंधित ठेकेदार कंपनीने ही वैधमार्गाने घेतली जाणारी रक्कम असून, ती साहित्य सुविधा म्हणून वापरली जाणार आहे. शिवाय ती अनामत रक्कम असल्याने काम सोडणाऱ्या कामगाराला परत केली जाणार आहे, असे स्पष्टीकरण दिले आहे. आत्तापर्यंत पाचशे कामगारांची भरती ठेकेदाराने पूर्ण केली आहे. मात्र, त्यातून वाद सुरू झाले आहेत. ठेकेदार प्रति उमेदवार १५ हजार रुपये आकारत असल्याची तक्रार असून, महापौर सतीश कुलकर्णी, उपमहापौर भिकूबाई बागुल, दिनकर पाटील, म्युनिसीपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे यांनी केली आहे.--------------------------सदरची रक्कम ही अनामत रक्कम म्हणून आहे. त्यातही कंपनीमार्फत दोन गणवेश, हँडग्लोज, गमबुट आणि कचरा उचलण्यासाठी व्हील बरोज व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जीपीएस यंत्रणा यासाठी हा खर्च आहेच, परंतु कोणी कामगार आठ-दहा-पंधरा दिवसांत सोडल्यास सुरक्षितता म्हणून ही अनामत रक्कम घेतली जात आहे, असे वॉटरग्रेसचे संचालक चेतन बोरा यांनी कळवले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक