शहरं
Join us  
Trending Stories
1
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
2
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
3
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
4
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्राललयाने दिली महत्त्वाची सूचना
5
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
6
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
7
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
8
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
9
'तुम्ही मनापासून त्यांना देव मानतच नव्हता'; दानवेंचा अजितदादांना टोला
10
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
11
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
12
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
13
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
14
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
15
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
16
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य
17
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
18
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
19
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
20
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र

नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत ३८ कोटी रुपयांच्या रस्ते दुरूस्ती प्रस्तावांवर आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 2:55 PM

तहकूब ठेवण्याची मागणी : शिवसेनेच्या सदस्यांकडून विरोध

ठळक मुद्देडांबरी रस्त्यांची देखभाल व दुरुस्तीसाठी १९ कोटी रुपयांचे आणि खडीचे कच्चे रस्ते दुरुस्तीसाठी १८ कोटी रुपयांच्या प्रस्तावांना आक्षेप नवी मुंबईच्या धर्तीवर रस्ते दुरुस्तीसाठी मायक्रो सर्फेसिंग तंत्राचा वापर करण्याची सूचना

नाशिक - महापालिकेच्या स्थायी समितीत डांबरी रस्त्यांची देखभाल व दुरुस्तीसाठी १९ कोटी रुपयांचे आणि खडीचे कच्चे रस्ते दुरुस्तीसाठी १८ कोटी रुपयांच्या प्रस्तावांना शिवसेनेसह अपक्ष सदस्यांनी आक्षेप घेत त्यासाठी मायक्रो सर्फेसिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सूचना केली. परंतु, सभापतींनी त्यास मंजुरी दिल्याने सेनेच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली.स्थायी समितीची सभा सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी, प्रशासनाकडून १९ कोटी १२ लाख रुपये खर्चाचे डांबरी रस्त्यांच्या दुरुस्तीचे विभागनिहाय प्रस्ताव ठेवण्यात आले होते. याशिवाय, विभागनिहाय खडीचे कच्चे रस्ते दुरुस्तीसाठी खडी, मुरुमसह जेसीबी, डंपर आदी साहित्य पुरविण्यासाठी १८ कोटी २० लाख रुपयांचे प्रस्ताव मांडण्यात आले होते. यावेळी, शिवसेनेचे सदस्य प्रविण तिदमे यांनी नवी मुंबईच्या धर्तीवर रस्ते दुरुस्तीसाठी मायक्रो सर्फेसिंग तंत्राचा वापर करण्याची सूचना केली. त्यामुळे मनपाची आर्थिक बचत होणार असल्याचे सांगितले. यावेळी, शहर अभियंता उत्तम पवार यांनी नवी मुंबईकडून त्याबाबतची माहिती मागविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले तर सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी येत्या अंदाजपत्रकात शहरातील दोन रस्ते प्रायोगिक तत्वावर या तंत्राने करण्यासाठी तरतूद करण्याचे आदेश दिले. सूर्यकांत लवटे यांनी सदर डांबरी रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे कामे ही पावसाळा संपल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात घेणे अपेक्षित असताना त्याला लागलेल्या विलंबाबद्दल जाब विचारला आणि आताच प्रभागनिहाय रस्ते विकासाची कामे केली जात असताना ही नवीन कोणती कामे सुरु करण्यात येणार आहेत, असा सवाल उपस्थित केला. मुशीर सैय्यद यांनी सदरच्या प्रस्तावांची माहिती सविस्तर सादर करेपर्यंत विषय तहकूबीची सुचना मांडली तर जगदीश पाटील यांनी रस्ता दुरुस्तीचे समर्थन करत त्याला मंजुरी देण्याची मागणी केली. यावेळी सभापतींनी प्रस्ताव मंजूर झाल्याचे सांगताच सेना सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली परंतु, नंतर त्यांचा विरोध मावळला. यावेळी, सूर्यकांत लवटे यांनी नाशिकरोडमधील अतिक्रमण हटविण्याची मागणी केली असता अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी पुढील आठवड्यात पोलीस बंदोबस्तात मोहीम सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. डी. जी. सूर्यवंशी यांनी प्रशासनावर सत्ताधा-यांचा वचक राहिला नसल्याचे सांगत भाजपाला चिमटे काढले तर पेस्टकंट्रोल ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यासंबंधीचा प्रस्ताव पुढील सभेत ठेवण्याचे आदेश सभापतींनी दिले.जलकुंभाचे काम उद्यापासूनमखमलाबाद परिसरातील जलकुंभ उभारण्याचे कामाबाबत सुनीता पिंगळे यांनी पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी पोलिसांना याबाबत पत्र देण्यात आले असून येत्या २४ जानेवारीपासून पोलीस बंदोबस्तात कामाला सुरूवात करणार असल्याचे स्पष्ट केले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका