मिठसागरे-देवपूर रस्ता दुरुस्तीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 11:15 PM2019-12-01T23:15:21+5:302019-12-01T23:16:00+5:30

पांगरी : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील मिठसागरे ते देवपूर रस्त्याची दुरवस्था झाली असून, सदर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Demand for repair of Mithsagare-Devpur road | मिठसागरे-देवपूर रस्ता दुरुस्तीची मागणी

सिन्नर तालुक्यातील मिठसागरे-देवपूर रस्त्याची झालेली दुरवस्था.

Next
ठळक मुद्देगैरसोय : वाहन चालविणे अवघड; रस्त्याचा पायवाट म्हणून वापर

लोकमत न्यूज नेटवर्क
पांगरी : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील मिठसागरे ते देवपूर रस्त्याची दुरवस्था झाली असून, सदर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मिठसागरे ते देवपूर या आठ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर मिठसागरे ते पांगरी चौफुलीपर्यंत डांबरीकरण झालेले आहे; मात्र पांगरी चौफुली ते देवपूर या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून, वाहन चालविणे अवघड झाले असून ‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागात राहणारे ग्रामस्थ या रस्त्याचा केवळ पायवाट म्हणून वापर करीत आहे.
या रस्त्यावर वाहने चालविताना मोठी कसरत होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचे काम झालेले नाही तसेच प्रथमच यावर्षी चांगला पाऊस होऊन परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी संजय वारुळे, संदीप वारुळे, शरद पगार, इंद्रभान डुकरे, प्रदीप तनपुरे, बबन तनपुरे, महेश तनपुरे, संदीप कासार, आनंदा वारु ळे आदींसह मिठसागरे व पांगरी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.केवळ पाच किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ग्रामस्थांना मिठसागरे-पांगरी-देवपूर फाटा असा लांबचा प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याची दुरुस्ती झाल्यास देवपूर येथे जाण्यासाठी ग्रामस्थांना जवळचा मार्ग उपलब्ध होणार आहे.
- संजय वारुळे, उपाध्यक्ष, विकास सोसायटी, पांगरी.

Web Title: Demand for repair of Mithsagare-Devpur road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.