शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कडवा कॅनॉलला आवर्तन सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:10 IST

निफाड व सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवरील अनेक गावांना दुष्काळाच्या झळा बसू लागल्या असून, परिसरातील विहिरी, कूपनलिका यांनी तळ गाठला असून, माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांचा चाऱ्यापाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, परिसरातील जीवनदायिनी असलेल्या कडवा कॅनॉलला आवर्तन सोडावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सायखेडा : निफाड व सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवरील अनेक गावांना दुष्काळाच्या झळा बसू लागल्या असून, परिसरातील विहिरी, कूपनलिका यांनी तळ गाठला असून, माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांचा चाऱ्यापाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, परिसरातील जीवनदायिनी असलेल्या कडवा कॅनॉलला आवर्तन सोडावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. निफाड तालुक्यात वर्षानुवर्षे दुष्काळाच्या झळा सोसणाºया भेंडाळी, औरंगपूर, बागलवाडी, पिंपळगाव निपाणी, तळवाडे, महाजनपूर या गावात मार्च महिन्यात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे, विहिरींनी तळ गाठला असून, त्यात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना वणवण भटकंती करावी लागत आहे, तर जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक वेळा धरणातील पाणी दारणा नदीपात्रात सोडले जाते; मात्र दारणा नदीला मुबलक पाणी आहे, शिवाय नदीच्या पाण्यात पाणी सोडून ज्या भागात पाणी मुबलक प्रमाणात असते त्याच भागाला पाणी मिळते त्यामुळे प्रशासनाने असे न करता कॅनल परिसरातील नागरिकांना पाणी मिळावे, उन्हाळ्याच्या झळा बसू नये, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची होत असलेली भटकंती थांबवावी यासाठी कडवा कॅनॉलला आवर्तन सोडावे आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.शेतातील उभी पिके पाण्याअभावी सुकू लागले आहे. यंदा चांगला पाऊस पडला होता, त्यामुळे पाण्याने मार्च महिना तग धरला असला तरी आज मात्र झळा बसू लागल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. या परिसरासाठी जीवनदायिनी असणाºया कडवा कॅनॉलमध्ये धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडल्याने धरणात उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे.

टॅग्स :WaterपाणीDamधरण