शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 23:34 IST

लासलगाव : नाफेडच्या माध्यमातून जास्तीत जास्त कांदा खरेदी करण्यात यावा अशी मागणी खासदार डॉ. भारती पवार यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

लासलगाव : नाफेडच्या माध्यमातून जास्तीत जास्त कांदा खरेदी करण्यात यावा अशी मागणी खासदार डॉ. भारती पवार यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.  दिंडोरी लोकसभा मतदार संघ हा कृषीप्रधान मतदारसंघ असून येथील शेतकरी हा मोठ्या प्रमाणावर उत्कृष्ट दर्जाच्या कांद्याचे उत्पादन घेतो. तर उत्कृष्ट दर्जाचा कांदा हा परदेशामध्ये निर्यात केला जातो. तो उत्पादित कांदा विक्र ीसाठी बाजार समित्यांमध्ये आणला जातो. सध्या कोरोना विषाणूच्या संक्र मणामुळे भारतातील सर्वच राज्यांत लॉकडाऊन केले आहे. मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन विक्र ीसाठी तयार असताना कांद्याचे दर देखील घसरले आहेत. त्याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. त्याचबरोबर अवकाळी पावसाने देखील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.  शेतक-यांचे हित लक्षात घेता केंद्रीय कृषी मंत्रालयाने राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघाद्वारे (नाफेड) जास्तीत जास्त कांदा योग्य किमतीत खरेदी करून कांदा उत्पादक शेतकºयांना दिलासा द्यावा याकरिता केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर व राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) यांचेकडे खासदार पवार यांनी पत्राद्वारे केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक