नाशिक पश्चिम वनविभागाकडून सोशल मीडियावर याबाबत सविस्तर माहितीपत्रक जाहीर करण्यात आले आहे. जैवविविधता संवर्धनासाठी भरीव कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्थांना या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याची संधी असल्याचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांनी सांगितले. सन २०१२ वर्षापासून हा पुरस्कार विविध व्यक्ती, संस्थांना प्रदान केला जात आहे. राष्ट्रीय जैवविविधता पुरस्कार-२०२३ करिता प्रवेशिका मागविण्यात आल्या आहे. येत्या ३० नाेव्हेंबरपर्यंत चेन्नई येथील कार्यालयाला प्रस्ताव सादर करण्याची मुदत आहे. प्रवेशिका पाच वर्गवारीत पाठविता येणार आहे. यामध्ये जैविक संसाधनाचा शाश्वत वापर व संवर्धन, जैवविविधता संवर्धनासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जैवविविधता समिती, योग्य व समन्यायी लाभांश प्रक्रिया यशस्विपणे राबविणाऱ्या संस्था किंवा व्यक्ती, उत्कृष्ट लोक जैवविविधता नोंदवही या पाच गटांचा समावेश आहे.
‘राष्ट्रीय जैवविविधता पुरस्कार’साठी प्रस्तावाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:11 IST