शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बैलगाडा शर्यतीला परवानगी देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 23:30 IST

इगतपुरी : महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला परवानगी द्यावी या मागणीसाठी मुंबई-आग्रा महामार्गावरील टाके घोटी येथे इगतपुरी तालुका बैलगाडाशौकीन शेतकऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी आमदार हिरामण खोसकर व तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना बैलगाडा शर्यती सुरू कराव्यात या मागणीचे निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देइगतपुरी तालुका बैलगाडाशौकीन शेतकऱ्यांचे आंदोलन

इगतपुरी : महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला परवानगी द्यावी या मागणीसाठी मुंबई-आग्रा महामार्गावरील टाके घोटी येथे इगतपुरी तालुका बैलगाडाशौकीन शेतकऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी आमदार हिरामण खोसकर व तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना बैलगाडा शर्यती सुरू कराव्यात या मागणीचे निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, बैलगाडा शर्यतीची महाराष्ट्राला सुमारे चारशे वर्षांची परंपरा आहे. पारंपरिक वारसा व शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडा शर्यतीकडे पाहिले जाते. तामिळनाडू व कर्नाटक या राज्यांमध्ये बैलगाडा शर्यतींबाबत कायदा केलेला आहे.बैलगाडा शर्यतीच्या आवडीमुळे देसी गाय-बैलांचे संगोपन चांगल्या प्रकारे केले जाते. शर्यतबंदीमुळे देसी गाय-बैलांचे उपयुक्तता मूल्य धोक्यात आल्यामुळे जतन संवर्धनाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. तसेच शर्यतबंदीमुळे शेतकऱ्यांची गाय-बैल संगोपनाची प्रेरणाच नष्ट होत आहे. ग्रामीण भागात देवदेवतांच्या यात्रेमध्ये बैलांचे प्रदर्शन, विक्री व शर्यती आयोजित करण्याची परंपरा आहे. यामुळे ग्रामीण भागात मोठी आर्थिक उलाढाल होते. यासाठी माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली सुनावणी तत्काळ घेतली जावी याबाबत प्रयत्न व्हावेत, यासंबंधी चर्चा करण्यासाठी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या प्रतिनिधींसमवेत  मुख्यमंत्री यांचे दालनात बैठक घेतली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे.या आंदोलनात आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, माजी जि. प. सदस्य संदीप गुळवे, गोरख बोडके, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर लहाणे, माजी सभापती रघुनाथ तोकडे, शिवसेना तालुका प्रमुख भगवान आडोळे, गटनेते विठ्ठल लंगडे, भगिरथ मराडे, माजी सरपंच कैलास भगत, प्रशांत कडू, हरिश्चंद्र चव्हाण अनिल भोपे, नंदलाल भागडे, त्र्यंबक गुंजाळ, दशरथ भागडे, हिरामण लहाणे, गोटीराम चव्हाण, जालिंदर कडू, शिवनाथ काळे, देवीदास लंगडे, देवानंद गोईकणे, पोपट लंगडे, राजू लहाने, कार्तिक कोंडाजी गतीर, गंगाराम कडू, गणेश गतीर, मच्छिंद्र तोकडे, बाजीराव गतीर, जगन गतीर, सुनील गुंजाळ, नामदेव लहाने, विजय कडू, अंकुश कडू, गुरुनाथ कडू, सुधाकर आडोळे, संजय भगत यांच्यासह शेकडो अखिल भारतीय शर्यतशौकीन उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक