शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

वसाका ऊस उत्पादकांना पेमेंट देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 01:02 IST

सटाणा, देवळा, कळवण व मालेगाव कार्यक्षेत्र असलेल्या वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याला सन २०१८-१९ या काळात ऊसपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांचे ऊस पेमेंट अद्याप मिळालेले नसून सरकारने तत्काळ अदा करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकरी प्रभाकर पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कळवण : सटाणा, देवळा, कळवण व मालेगाव कार्यक्षेत्र असलेल्या वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याला सन २०१८-१९ या काळात ऊसपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांचे ऊस पेमेंट अद्याप मिळालेले नसून सरकारने तत्काळ अदा करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकरी प्रभाकर पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे की, वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यावर शासन नियुक्त प्राधिकृत मंडळ नियुक्त करण्यात आले होते; मात्र सन २०१६-१७ या काळात कारखाना बॉयलर पूजन करूनही बंद राहिला. कारखान्याचे ऊस उत्पादक, कामगार यांचे मोठे नुकसान झाले होते. हा कारखाना सन २०१८-१९ या काळात उस्मानाबाद येथील धाराशिव साखर कारखाना युनिट-१ चे अध्यक्ष अभिजित पाटील यांना भाडेतत्त्वावर करार करून चालविण्यास दिला आहे. चालू हंगामाच्या गव्हाण पूजनवेळी कादवा व द्वारकाधीश साखर कारखाने जो भाव देतील त्यापेक्षा १ रु पया जास्त भाव देऊ, असे आश्वासन देण्यात आले होते; मात्र कारखान्याकडून काही शेतकऱ्यांना २ हजार अ‍ॅडव्हान्स पेमेंट केले तर काहींना पेमेंटच केले नाही. बहुतांशी शेतकºयांना धनादेश देण्यात आले आहेत; मात्र कारखान्याच्या खात्यात शिल्लक रक्कम नसल्याने धनादेश वटले नाहीत. त्यात कारखाना चालविणारा करारधारक बेपत्ता झाला असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. देणे देण्यास जबाबदार यंत्रणेमार्फत शोधून शेतकºयांच्या उसाचे पेमेंट अदा करण्यास भाग पाडावे अशी मागणी निवेदनात प्रभाकर पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :NashikनाशिकSugar factoryसाखर कारखाने