शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षकांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 16:09 IST

१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व त्यानंतर टप्प्याटप्प्याने शंभर टक्के अनुदानास पात्र अंशत: अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू होती. तत्कालीन मंत्रिमंडळाने ११ आॅक्टोबर २००५ रोजी निर्णय

नाशिक : १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या अनुदानित व विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी कर्मचारी पेन्शन संघर्ष समितीच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येऊन निवेदन देण्यात आले.यावेळी जिल्हाधिका-यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व त्यानंतर टप्प्याटप्प्याने शंभर टक्के अनुदानास पात्र अंशत: अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू होती. तत्कालीन मंत्रिमंडळाने ११ आॅक्टोबर २००५ रोजी निर्णय घेऊन दिनांक १ नोव्हेंबर २००५ नंतर शासन सेवेत रुजू होणा-या कर्मचाºयांसाठी १९८२ ची जुनी पेन्शन योजना रद्द केली व त्यानंतर डी.सी.पी.एस. योजना लागू केली. शासनाच्या या निर्णयाला महाराष्टÑ कायदेमंडळाची मान्यता मिळालेली नसल्याने अंशदायी पेन्शन योजना जबरदस्तीने थोपविण्यात येत आहे. सदर योजनेच्या कायदेबाह्य सक्तीमुळे १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या अंशत: अनुदानित व विनाअनुदानित शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांवर अन्याय होत आहे तसेच निधीच्या उपलब्धतेनुसार या शाळांना टप्प्याने अनुदान वितरित करण्यात आले. त्यामुळे या सर्व शाळा सन २००७ मध्ये शंभर टक्के अनुदानावर आल्या याचा ३१ आॅक्टोबर २००५ च्या शासन निर्णयात कुठेही उल्लेख नसताना दि. २९ नोव्हेंबर २०१० च्या शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयाने पूर्वलक्षी प्रभावाने अंशत: अनुदानित व विनाअनुदानित शाळेतील जवळपास ५०००० कर्मचा-यांना वंचित ठेवले आहे. अशा सर्व कर्मचा-यांची सहाव्या वेतन आयोगातील थकबाकी १० वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतरसुद्धा सस्पेन्समध्येच आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयाने शासनाच्या या आदेशाला स्थगिती दिली असून, १ नोव्हेंबर २००५ पूर्वनियुक्त झालेल्या अंशत: अनुदानित व विनाअनुदानित शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांना नवीन डीसीपीएस योजना लागू होऊ शकत नाही तरीही शासनाने भविष्य निर्वाह निधीचे खाते बंद केले आहे. सदर खाते तत्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. या आंदोलनात अशोक सोमवंशी, मंगेश सूर्यवंशी, संगीता शिंदे, नलिेश ठाकूर, संजय देसले, दिनेश अहिरे, योगेश पाटील, श्रावण साठे, नितीन पाटील, नारायण दिगंबर, सुगंधा सोनवणे, दत्तात्रय सांगळे, नरेंद्र शिरसाट, सचिन पगार, देवदत्त अहिरराव सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक