शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

कुलगुरुंचे अकाउंट हॅक करून पैशांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 01:49 IST

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई. वायुनंदन यांचे फेसबुक हॅक करून सायबर चोरट्याने त्यांच्या मित्रांशी संवाद साधून पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुदैवाने अशाप्रकारचे संदेश फेसबुक मॅसेंजरच्या माध्यमातून प्राप्त होताच वायुनंदन यांच्या मित्रांनी त्यांचाशी संवाद साधून अशाप्रकारे पैशांची मागणी होत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर वायुनंदन यांनी सोशल माध्यमांतून असा प्रकार घडल्याचे स्पष्ट केले  आहे.

ठळक मुद्देसंदेश फेक असल्याने फसवणूक टळली

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई. वायुनंदन यांचे फेसबुक हॅक करून सायबर चोरट्याने त्यांच्या मित्रांशी संवाद साधून पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुदैवाने अशाप्रकारचे संदेश फेसबुक मॅसेंजरच्या माध्यमातून प्राप्त होताच वायुनंदन यांच्या मित्रांनी त्यांचाशी संवाद साधून अशाप्रकारे पैशांची मागणी होत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर वायुनंदन यांनी सोशल माध्यमांतून असा प्रकार घडल्याचे स्पष्ट केले  आहे.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई. वायुनंदन यांचे फेसबुुक अकाउंट सोमवारी (दि.१०) सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास हॅक करून वायुनंदन यांना तत्काळ काही पैशांची गरज असल्याचे एकाने भासवत ऑनलाइन पैशांची मागणी केली. त्यासाठी सायबर चोरट्याने पीवायटीएम ०१२३४५६ आयएफएश कोड असलेल्या खाते क्रमांक ९१८० ९९६५३०४७ वर पैसे पाठविण्याची विनंती केली.     (पान ७ वर)

मात्र पैशांची मागणी करणाऱ्या सायबर चोरट्याने अवघ्या आठ ते दहा हजार रुपयांची मागणी केली. नाशिक शहरात गेल्या काही दिवसांमध्ये सायबर गुन्हेगारांचा उपद्रव वाढला आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीच नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप थेटे यांना फोनवरून ईडीचा अधिकारी असल्याचे भासवत खंडणी मागण्याचा प्रकार ताजा असतानाच अवघ्या दोन दिवसांत चक्क कुलगुरूंचेच फेसबुक अकाउंट हॅक करून फेसबुक फ्रेंड्सकरून पैसे मागण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे नाशिक शहरात सायबर गु्न्हेगारांचा उपद्रव वाढल्याने सायबर पोलिसांसमोर या गुन्हेगारांनी आ‌व्हान निर्माण केले आहे.फेसबुकवरून पैशांची मागणी करणारे फेक संदेश दिले जात असल्याचे समजताच फेसबुकवरून अशा प्रकारच्या संदेशांना कोणीही बळी पडू नये, असे आवाहन केले. त्यामुळे कोणीही या फेक संदेशांना बळी पडलेले नाही. मात्र असा प्रकार घडणे दुर्दैवी असून, याविषयी संपूर्ण तपशील घेऊन सायबर पोलिसांमध्ये तक्रार करणार आहे. - ई. वायुनंदन, कुलगुरू, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइम