शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

अधिकमास निमित्ताने खापराच्या मांड्यांना मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 01:39 IST

येवला : यंदा कोरोनाने बाजारपेठांसह सणवार, मंदिर आदी सर्वच लॉकडाऊन झाले. परिणामी तीन वर्षानंतर येत असलेला अधिकमास अर्थात धोंड्याचा महिनाही कोरोनाच्या सावटाखालीच साजरा होत आहे. तर खास जावईबापूंसाठी खापराच्या मांड्यांना मात्र मागणी वाढली असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागात गावोगावी खापरावरील मांडे बनविण्याची लगबग

येवला : यंदा कोरोनाने बाजारपेठांसह सणवार, मंदिर आदी सर्वच लॉकडाऊन झाले. परिणामी तीन वर्षानंतर येत असलेला अधिकमास अर्थात धोंड्याचा महिनाही कोरोनाच्या सावटाखालीच साजरा होत आहे. तर खास जावईबापूंसाठी खापराच्या मांड्यांना मात्र मागणी वाढली असल्याचे दिसून येत आहे.अधिकमास निमित्ताने सासुरवाडीहून जावईबापूंना खास निमंत्रण दिल्या जाते. सासरी आलेल्या जावईबापूंना खास गोडाधोडाचे भोजन व भेट दिल्या जाते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर या समारंभाला मर्यादा आल्या असल्या तरी ग्रामीण भागात गावोगावी खापरावरील मांडे बनविण्याची लगबग दिसून आली.ग्रामीण भागात काही महिलांनी खापरावर मांडे तयार करून विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. साधारणत: मांड्याची साईज दीड बाय दीडची असते. एका मांड्याची किंमत 70 रूपये आहे. ज्यांना घरी मांडे करणे शक्य नाही ते या महिलांकडून मांडे खरेदी करतात. गव्हाचे पिठ, गुळ, हरभरा दाळ आदी सामग्री पासुन बनविण्यात येणारा मांडा मातीच्या खापरावर भाजल्या जातो. खाण्याला स्वादिष्ट व चविष्ट लागणार्‍या या खापरावरील मांड्यांना ग्रामीण भागासह शहरवासीयांचीही पसंती मिळत आहे. 

 

टॅग्स :yevla-acयेवलाNashikनाशिक