शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

अंत्यविधीचे साहित्य मोफत देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 5:00 PM

मालेगाव : शहरातील हिंदू-दलित स्मशानभूमीत आर्थिक दुर्बल घटकातील जनतेस अंत्यविधीसाठी लागणारे लाकूड, रॉकेल आदि साहित्य मोफत उपलब्ध व्हावे या दृष्टीकोनातून मालेगाव महानगरपालिकेच्या वार्षिक अंदाजपत्रकात खर्चाची विशेष तरतूद करावी, असे साकडे सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी महापौर रशीद शेख, स्थायी समिती सभापती जयप्रकाश बच्छाव, आयुक्त किशोर बोर्डे यांना घातले आहे.

नगरसेवक अ‍ॅड. गिरीष बोरसे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या शिष्ठमंडळाने स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी मोफत साहित्य उपलब्ध करुन देण्याबाबत महापालिका प्रशासनाला साकडे घातले. नाशिक, धुळे, जळगाव महानगरपालिका आणि सटाणा नगरपरिषदेतर्फे अंत्यविधीसाठी हिंदू-दलित समाजातील आर्थिक दुर्बलांना लाकडे व रॉकेलची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेमुळे गोरगरीबांना निश्चितच मदत होत आहे. मालेगाव शहरात ८० टक्के कामगार वर्गाचे शहर आहे. गोरगरीब जनतेस आर्थिक मंदीमुळे दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत पडली आहे. अशा आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबांना अंत्यविधीसाठी लागणारे लाकूड, रॉकेल आदि साहित्य मोफत उपलब्ध करुन दिल्यास निश्चित दिलासा मिळेल. महापालिकेच्या वार्षिक अंदाजपत्रकात या खर्चाची तरतूद करत गोरगरीब जनतेस दिलासा देण्यात यावा, अशी मागणी भारत म्हसदे, जितेंद्र देसले, बापू पवार, आनंद भोसले, गुलाब पगारे, गोटू भरत पाटील, तुषार जगताप, राम गवळी, उतञतम कचवे, भरत चौधरी, मनोज पाटील, राहूल जगताप, संजय पाटील, अ‍ॅड. मधुकर वडगे, किरण पाटील, निंबा बोरसे, चेतन सूर्यवंशी, राजेंद्र गोलाईत, भारत बेद, प्रमोद पाटील, मिलींद गोसावी, चेतन सूर्यवंशी, मधुकर अहिरे आदिंसह सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केली आहे

टॅग्स :MalegaonमालेगांवMuncipal Corporationनगर पालिका